ETV Bharat / state

Firearms Seized From Gangster: देशी कट्ट्यासह दोन जिवंत काडतूस जप्त; दोघे मित्र गजाआड

author img

By

Published : Nov 2, 2022, 6:37 PM IST

गुन्हेगारी प्रवृत्तीच्या दोन तरुणांना ताब्यात घेत कसून चौकशी करण्यात आली. तसेच त्यांच्याकडून देशीकट्टा आणि दोन जिवंत काडतुसे (firearms seized from gangster) जप्त (live cartridges along with country cutta seized) करण्यात आली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा आणि पुसद शहर पोलिसांनी 31 ऑक्टोबरला रात्री (Interrogation of youths with criminal tendencies) महागाव तालुक्यातील डोंगरगाव येथे केली. या कारवाईने अग्निशस्त्र (firearms seized) बाळगणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.

Accused arrested with Gun
शस्त्रांसह गुन्हेगाराला अटक

यवतमाळ : गुन्हेगारी प्रवृत्तीच्या दोन तरुणांना ताब्यात घेत कसून चौकशी करण्यात आली. तसेच त्यांच्याकडून देशीकट्टा आणि दोन जिवंत काडतुसे (firearms seized from gangster) जप्त (live cartridges along with country cutta seized) करण्यात आली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा आणि पुसद शहर पोलिसांनी 31 ऑक्टोबरला रात्री (Interrogation of youths with criminal tendencies) महागाव तालुक्यातील डोंगरगाव येथे केली. या कारवाईने अग्निशस्त्र (firearms seized) बाळगणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.

देशी कट्टा दाखवून बेधूंद नाचताना गुंड प्रवृत्तीचे युवक

चौकशीत उलघडले देशी कट्ट्यांचे रहस्य - सैय्यद मुस्सवीर सैय्यद जमीर (रा. डोंगरगाव) आणि मजहर खान जफरउल्ला खान (रा. पुसद) अशी अटकेतील गुन्हेगारांची नावे आहेत. त्या दोघांकडे देशीकट्टा असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांना मिळाली होती. त्यावरून त्यांनी पुसद येथे पथक पाठवून पुसद शहरचे ठाणेदार दिनेश शुक्ला यांची मदत घेत सुरुवातीला आरोपी मजहर खान याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची पोलिसांनी कसून चौकशी केली. तेव्हा त्याने मित्र सैय्यद मुस्सवीर याचे नाव उघड केले. त्याच्याच मालकीचा तो देशीकट्टा असून दोघेही आळीपाळीने त्याचा वापर करीत असल्याचेही स्पष्ट केले. त्यानंतर पोलिसांचे पथक महागाव तालुक्यातील डोंगरगाव येथे मजहर खान याला घेऊन गेले. तेथे सैय्यद मुस्सवीरला ताब्यात घेत त्याचीही कसून चौकशी केली. तेव्हा त्याने देशीकट्टा आणि दोन जिवंत काडतूस आपल्याकडे असल्याची कबुली दिली.

Firearms Seized From Gangster
देशीकट्टा जप्त

देशीकट्ट्यासह काडतुसे जप्त - शिवाय, राहत्या घरातून देशीकट्टा आणि काडतुसे काढून दिली. पोलिसांनी देशीकट्ट्यासह काडतुसे जप्त केली. तसेच आरोपींसह अग्नीशस्त्र पोफाळी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोफाळी पोलिसांनी आरोपी मजहर खान आणि सैय्यद मुस्सवीर या दोघांविरुद्ध भारतीय शस्त्रास्त्र प्रतिबंधक कायद्याच्या 3 (25), 35 कलमान्वये गुन्हा दाखल करून त्या दोघांना अटक केली. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे एपीआय गणेश वनारे, विवेक देशमुख, फौजदार सागर भारस्कर, जमादार उल्हास कुरकुटे, किशोर झेंडेकर, सुधिर पिदूरकर, जितेंद्र चौधरी, पुसद शहरचे फौजदार राजू खांदवे, शिपाई जलाल शेख, सुनिल ठोंबरे आदींनी सहभाग घेतला होता.

अग्निशस्त्रातून गोळीबार करणे भोवले - काही दिवसांपूर्वी सैय्यद मुस्सवीर याच्या डोंगरगाव येथील राहत्या घरी एक कार्यक्रम होता. या कार्यक्रमात त्याने लोडेड देशीकट्टा मित्र मजहर खान याच्या हातात दिला. तेव्हा मजहर खानने या कार्यक्रमातच जल्लोष करताना त्या देशी कट्ट्यातून हवेत गोळीबार केला. या गोळीबाराची चांगलीच चर्चा महागावसह पुसद तालुक्यात होती. त्यातूनच ही माहिती पोलिसांच्या कानापर्यंत पोहोचली. त्यानंतर खातरजमा करून पोलिसांनी दोघांनाही बेड्या ठोकल्या. एवढेच नव्हेतर घातक अग्निशस्त्र आणि काडतुसेही जप्त केली. एकंदरच कार्यक्रमात हवेत गोळीबार करणे दोघांनाही चांगलेच भोवल्याची चर्चा कारवाईनंतर होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.