यवतमाळ - यवतमाळच्या पुसद तालुक्यातील शेंबाळपिंपरी गावात फलक काढण्याच्या वादातून दोन गटात तुफान ( Yavatmal Shembalpimpri Two Group Fight ) दगडफेक झाली. यामध्ये सरपंच सहित आठ ते दहा जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. पोलीस पथक आणि तहसीलदार घटनास्थळी दाखल झाले आहे. तसेच, दंगल नियंत्रक पथकही घटनास्थळी पोहचले आहे.
शेंबाळपिंपरी गावात फलक काढण्याच्या वादातून दोन गटांत तणाव निर्माण ( Shembalpimpri Two Group Fight ) झाला. त्याचे रुपांतर नंतर दगडफेकीत झाले. या दगडफेकीत सरपंचासोबत आठ ते दहा जखमी झाले आहे. यात पोलिसांच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली आहे. सद्यस्थितीत गावातील गडफेक बंद आहे. या घटनेमुळे शहरातील बाजारपेठ पूर्णपणे बंद झाली असून, मात्र तणावपूर्ण वातावरण आहे. पुसद, उमरखेड, यवतमाळ येथून शेंबाळपिंपरीत एसआरपीएफची एक तुकडी पाठवण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे, स्थनिक गुन्हे शाखा गावात दाखल झाले आहे.