ETV Bharat / state

अपघातात दोघा भावांचा मृत्यू; मारेगाव तालुक्यातील घटना - यवतमाळ जिल्हा बातमी

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरुन जाणाऱ्या दोघा सख्ख्या भावंडाचा मृत्यू झाला आहे.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Nov 1, 2020, 3:51 PM IST

यवतमाळ - मारेगाव तालुक्यातील करणवाडी फाट्याजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीस धडक दिली. या अपघातात दोघा सख्ख्या भावंडाचा मृत्यू झाले आहे. तुकाराम रामभाऊ उईके (वय 51 वर्षे), विजय रामभाऊ उईके (वय 48 वर्षे, दोघे रा. घाटंजी), भावंडाचे नाव आहे.

31 ऑक्टोबरला दोघेही घाटंजीहून वणी येथे तेरवीच्या कार्यक्रमाला आपल्या दुचाकीवरून (एम एच 29 बी के 9102) आले होते. कार्यक्रम आटोपून ते दोघेही दुचाकीने गावाकडे जाण्यासाठी निघाले. करणवाडी फाट्यासमोर येताच त्यांचा अपघात झाला. यात एकाच जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्याने ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान शेवटचा श्वास सोडला.

मृत विजय उईके हा राज्य परिवहन विभागात वाहन चालक होते. विजयच्या मागे पत्नी, दोन मुले आहे. तर दुसरा मृत तुकाराम हा शेतकरी असून त्याच्या पाश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी, असा परिवार आहे. या घटनेत दोन्ही भावांचा अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

घटनेची माहिती मारेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगदीश मंडलवार यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. अज्ञात वाहनाचा शोध सुरू असून पुढील तपास मारेगाव पोलीस ठाणे करीत आहे.

हेही वाचा - यवतमाळात खासदार बाळू धानोरकर यांच्या वक्तव्याचा भाजपकडून निषेध

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.