यवतमाळ- जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात 23 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. 13 जण उपचारामुळे बरे झाल्यावर त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. 23 जणांमध्ये 10 पुरुष व 13 महिलांचा समावेश आहे.
कोरोनाबाधित रुग्णांमध्ये पुसद शहरातील उम्मद नगर येथील एक महिला, यवतमाळ शहरातील तायडे नगर येथील एक महिला, दत्तमंदिर वडगाव येथील तीन महिला आणि एक पुरुष, यवतमाळ शहरातीलच आर्णी रोड येथील एक महिला, उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथील एक पुरुष, पुसद येथील तीन पुरुष व दोन महिला, वणी येथील दोन महिला, दारव्हा येथील एक महिला व एक पुरुष आणि यवतमाळ येथील चार पुरुष व दोन महिलांचा समावेश आहे.
23 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 94 झाली आहे. गुरुवारी वैद्यकीय महाविद्यालयाला 348 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 23 पॉझिटिव्ह आणि 319 रिपोर्ट निगेटिव्ह असून 6 रिपोर्टचे अचूक निदान होणे बाकी आहे.
सद्यस्थितीत वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात 115 जण भरती आहेत. जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 379 वर गेला आहे. यापैकी 272 जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आलीय, तर जिल्ह्यात 13 जणांच्या मृत्यूची नोंद आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने गुरुवारी 34 नमुने तपासणीकरीता प्रयोगशाळेत पाठवले. सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण 6501 नमुने प्रयोगशाळेत पाठवले असून यापैकी 6275 प्राप्त तर 226 अहवाल अप्राप्त आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 5896 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे.