ETV Bharat / state

विलगिकरण कक्षातून पळाले वीस पॉझिटिव्ह रुग्ण; घाटंजी येथील घटनेने खळबळ - यवतमाळ कोरोना न्यूज

घांटजी येथील कोव्हिड केअर सेंटरमधून २० कोरोनाबाधित रुग्ण पसार झाले. यातील 19 रुग्ण आमडी व एक रुग्ण वागद येथील असून या घटनेची तक्रार घाटंजी पोलीस ठाण्यात वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पुराम यांनी दाखल केली आहे.

yavatmal corona
विलगिकरणातून कक्षातून पळाले वीस पॉझिटिव्ह रुग्ण
author img

By

Published : Apr 25, 2021, 1:48 PM IST

यवतमाळ - घाटंजी येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रांमध्ये असलेल्या कोव्हिड केअर सेंटर असलेल्या विलगिकरणातून 20 जण पळाले. हे सर्वजण कोरोना पॉझिटिव्ह आहेत. ही घटना उघडकीस येताच खळबळ उडाली. या सर्व पॉझिटिव्ह रुग्णांचा शोध घेण्याचे काम रात्रभर सुरू होते. यातील 19 रुग्ण आमडी व एक रुग्ण वागद येथील असून या घटनेची तक्रार घाटंजी पोलीस ठाण्यात वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पुराम यांनी दाखल केली आहे.

केंद्रावर सुविधेच्या अभावामुळे रुग्ण पसार -

तालुकास्तरावर असलेल्या विलगीकरण केंद्रांमध्ये आवश्यक त्या वैद्यकीय व भौतिक सुविधा नसल्याने अनेक रुग्ण तिथे जाण्यास टाळाटाळ करत आहेत. त्या केंद्रांमध्ये प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी पुरेशा प्रमाणात नसल्याने रुग्णांना योग्य सेवा मिळत नाही. त्यामुळे शासन व प्रशासनाने नवीन विलगीकरण केंद्र बनविण्याऐवजी आधी आहे त्या केंद्रांमध्ये योग्य सुविधा द्याव्या जेणेकरून लोक विलगीकरणाला टाळाटाळ करणार नाहीत. सध्या ग्रामीण भागातील अनेक रुग्ण चाचणी करण्यास धजावत नाहीत. त्यामुळे समस्या आणखी गंभीर होत आहे.

विलगिकरणातून कक्षातून पळाले वीस पॉझिटिव्ह रुग्ण..

सॅनिटायझर प्यायल्याने ५ जणांचा मृत्यू -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या कडक निर्बंधांमध्ये दारूची दुकाने बंद आहेत. दारूची लत भागविण्यासाठी सॅनिटायझर पिल्याने पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना वणी येथे घडली आहे. दत्ता लांजेवार, नूतन पाथरटकर, गणेश शेलार, संतोष मेहर, सुनील ढेंगळे अशी पाच मृत व्यक्तींची नावे आहेत. यातील दोघांचे शवविच्छेदन करण्यात आले.

काल दोघांचा तर आज तिघांचा मृत्यू

काल सायंकाळी दोन व्यक्तींचा सॅनिटायझर पिल्याने मृत्यू झाला होता. तर रात्रीतून आणखी तिघांचा सॅनिटायझर पिल्याने मृत्यू झाला आहे. त्यामुळे सॅनिटायझर पिऊन मृत्यू झालेल्या व्यक्तींची संख्या आता पाच झाली आहे. वणी शहरातील तेली फैलमधील दत्ता लांजेवार (वय 47) यांनी रात्री 9 च्या सुमारास आपली दारूची लत भागविण्यासाठी सॅनिटायझर पिले आणि नंतर घरी आल्यावर रात्री दहा वाजता त्याच्या छातीत त्रास होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर असह्य वेदना होत असल्याने दत्ताला वणी ग्रामीण रुग्णालयात भर्ती करण्यात आले. तिथे रात्री 11 वाजताच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तसेच नूतन पाथरकर (वय 33) याचाही सॅनिटायझर पिऊन मृत्यू झाला आहे. त्याने रात्री सॅनिटायझर पिले आणि नंतर त्याला त्रास होत असल्याने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले असता तिथून तो घरी निघून आला आणि पहाटे त्याचा मृत्यू झाला. तसेच वणीच्या एकतानगर येथील संतोष मेहर याने सुद्धा सॅनिटायझर पिल्याने पहाटे 3.30 वाजता घरीच मृत्यू झाला. तसेच एकतानगरजवळ ढकल ठेला चालवून उदरनिर्वाह करणारा गणेश शेलार आणि सुनील ढेंगळे यांचा सुद्धा रात्री सॅनिटायझ पिल्याने घरीच मृत्यू झाला.

हेही वाचा - दारू मिळेना म्हणून प्यायले सॅनिटाझर; यवतमाळमध्ये पाच जणांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.