ETV Bharat / state

यवतमाळ येथे वन कामगारांवर वाघाचा हल्ला; मजूर गंभीर जखमी

यवतमाळ - जिल्ह्यातील झरी जामणी तालुक्यातील वनविभागाच्या दाभाडी येथे रस्त्याचे काम करणाऱ्या वन कामगारांवर वाघाने हल्ला केला.

संग्रहीत छायाचित्र
author img

By

Published : May 7, 2019, 11:45 PM IST

यवतमाळ - जिल्ह्यातील झरी जामणी तालुक्यातील वनविभागाच्या दाभाडी येथे रस्त्याचे काम करणाऱ्या वन कामगारांवर वाघाने हल्ला केला. यात दादाराव दडांजे हा मजूर गंभीर जखमी झाला आहे.

येथे 10 कामगार जंगलात रस्त्याचे काम करीत असताना वाघाने अचानकपणे मजुरावर हल्ला केला. यात एक जण जखमी झाला आहे. हल्ला होताच इतरांनी आरडाओरडा केल्याने वाघ पळून गेला. या भागात वाघाने हल्ला केल्याची या आठवड्यातील दुसरी घटना आहे. गंभीर जखमी झालेल्या दादाराव दडांचे या वनमजुराला पांढरकवडा येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर यवतमाळ जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. झरीजमनी पांढरकवडा या भागात टिपेश्वर अभयारण्य लागून आहे. तसेच तेलंगणा या राज्याची सीमा ही या भागातून जाते. या परिसरात असलेल्या जंगली भागामुळे नेहमीच या भागात वाघाचा वावर असतो.

टिपेश्वर अभयारण्यामध्ये सोळा वाघांची नोंद आहे. तर झरीजामणी या तेलंगणा राज्याच्या जंगलामध्ये जवळपास वाघ असल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली. वन्यप्राण्यांसाठी जंगलामध्ये पाणवठ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, या पाणवठ्यामध्ये पाणी नसल्याने पाण्याच्या शोधात ते जंगली श्वापदे गावाकडे वळू लागली आहेत. याच कारणाने वन्य प्राण्यांचे शेतकरी आणि शेतमजूर यांच्यावर हल्ले वाढले आहेत.

Intro:वन कामगारांवर वाघाचा हल्ला; मजूर गंभीर जखमीBody:यवतमाळ : जिल्ह्यातील झरी जामणी तालुक्यातील वनविभागाच्या दाभाडी येथे रस्त्याचे काम करणाऱ्या वन कामगारांवर वाघाने हल्ला केला. यात दादाराव दडांजे हा मजूर गंभीर जखमी झाला आहे. येथे 10 कामगार जंगलात रस्त्याचे काम करीत असताना वाघाने अचानकपणे मजुरावर हल्ला केला. यात एक जण जखमी झाला आहे. हल्ला होताच इतरांनी आरडाओरडा केल्याने वाघ पळून गेला. या भागात वाघाने हल्ला केल्याची याआठवड्यातील दुसरी घटना आहे. गंभीर जखमी झालेल्या दादाराव दगडांचे या वनमजुराला पांढरकवडा येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर यवतमाळ जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. झरीजमनी पांढरकवडा या भागात टिपेश्वर अभयारण्य लागून आहेत. तसेच तेलंगणा या राज्याची सीमा ही या भागातून जाते या परिसरात असलेल्या जंगली भागामुळे नेहमीच या भागात वाघाचा वावर राहतो. टिपेश्वर अभयारण्य मध्ये सोळा वाघांची नोंद आहेत तर झरीजामणी तेलंगणा या राज्याच्या जंगलामध्ये जवळपास हिच्यावर वाघ असल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली. वन्यप्राण्यांसाठी जंगलामध्ये पाणवठ्याची व्यवस्था करण्यात आली. मात्र या पाणवठ्यामध्ये पाणी नसल्याने पाण्याच्या शोधात ते जंगली श्वापदे गावाकडे वळू लागले आहेत. याच कारणाने वन्य प्राण्यांचेे शेतकरी शेतमजूर यांच्यावर हल्ले वाढले आहेत.Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.