ETV Bharat / state

'अवनी' वाघिणीनंतर पांढरकवड्यात पुन्हा वाघाचा धुमाकूळ; एक शेतकरी ठार - अवनी बातमी

T1 (अवनी) वाघिणी नंतर पुन्हा एकदा पांढरकवडा तालुक्यात वाघाचा धुमाकूळ सुरू झाला आहे. पांढरकवडा वनविभागाचे पथक घटनास्थळी रवाना झाले आहे. वाघाच्या हल्ल्यामध्ये प्रतिकार करताना मृत संभाजी कुडमथे यांना वाघाने अर्धा किलोमीटर ओढत नेले.

वाघ
author img

By

Published : Sep 23, 2019, 8:56 PM IST

यवतमाळ - पांढरकवडा तालुक्यातील वांजरी बल्लारपूर शेतशिवारात वाघाने हल्ला करून शेतकऱ्यास ठार केल्याची घटना घडली. संभाजी कुडमथे, असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. सायंकाळच्या सुमारास आपल्या शेतात जनावरे चारत असताना वाघाने अचानक त्यांच्यावर हल्ला केला.

हेही वाचा- या आठवड्यात तीन दिवसच बँक चालू राहणार; २६ व २७ सप्टेंबरला बँक कर्मचाऱ्यांचा संप

T1 (अवनी) वाघिणीनंतर पुन्हा एकदा पांढरकवडा तालुक्यात वाघाचा धुमाकूळ सुरू झाला आहे. पांढरकवडा वनविभागाचे पथक घटनास्थळी रवाना झाले आहे. वाघाच्या हल्ल्यामध्ये प्रतिकार करताना मृत संभाजी कुडमथे यांना वाघाने अर्धा किलोमीटर ओढत नेले. पांढरकवडा तालुक्यातील बल्लारपूर या गावातील शेतकरी संभाजी कुडमेथे हे दिवसभर आपल्या शेतामध्ये काम केल्यानंतर जनावरे चारत होते. यावेळी अचानक वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. वाघ आणि संभाजी कुडमेथे यांच्यात झटापट झाली असून अर्धा किलोमीटर त्यांना वाघाने ओढत नेऊन ठार केले.

हेही वाचा- शेअर बाजाराची १३०० अंशाची उसळी; निर्देशांकाने गाठली पुन्हा ३९,००० ची पातळी

सायंकाळच्या सुमारास संभाजी कुडमेथे हा घरी न आल्याने त्यांची शोधाशोध सुरू झाली. यावेळी त्यांच्यावर वाघाने हल्ला केल्याचे समजले. ही माहिती गावकऱ्यांनी वनविभागाला दिली. उपवनसंरक्षक के अभरणा व वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी संगीता कोकणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.

T1 (अवनी) वाघिणीला ठार केल्यानंतर तिच्या दोन बछड्यांना पकडण्याची मोहीम वन विभागाकडून सुरू करण्यात आली होती. यातील एक मादी बछडा पकडण्यात आला आहे. त्याला स्थलांतरित करण्यात आले आहे. तर नर बछडा अद्यापही जंगलातच वावरत आहे. पांढरकवडा भागातील जंगलालगत टिपेश्वर अभयारण्य असल्याने या भागातील वाघाने किंवा T1 वाघिणीच्या बछड्याने ही शिकार केली असल्याचे गावकऱ्यांत चर्चा सुरू आहे. मागील आठ ते दहा महिन्यांपासून बिंदास्त शेतीमध्ये काम करीत असणाऱ्या शेतकऱ्यांना पुन्हा वाघाची दहशत निर्माण झाली आहे.

Intro:Body:यवतमाळ : पांढरकवडा तालुक्यातील वांजरी बल्लारपूर शेतशिवारात वाघाने हल्ला करून शेतकऱ्यास ठार केल्याची घटना घडली. संभाजी कुडमेथे (52 ) रा.बल्लारपूर असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.
सायंकाळच्या सुमारास आपल्या शेतात जनावरे चारत असताना वाघाने अचानक हल्ला केला.
T1 (अवनी)वाघिणीला नंतर पुन्हा वाघाचा पांढरकवडा तालुक्यात धुमाकूळ सुरू झाला आहे. पांढरकवडा वनविभागाचे पथक घटनास्थळी रवाना झाले आहे.
वाघाच्या हल्ल्यामध्ये प्रतिकार करताना मृतक संभाजी कुडमथे याला अर्धा किलोमीटर ओढत नेले.
पांढरकवडा तालुक्यातील बल्लारपुर या गावातील शेतकरी संभाजी कुडमेते हे दिवसभर आपल्या शेतामध्ये काम केल्यानंतर जनावरे चारत होते. मात्र याच वेळी अचानक वाघाने हल्ला करून त्याला ठार केले. या वाघ आणि संभाजी कुडमेथे यांच्यात झटापट झाली असून अर्धा किलोमीटर त्याला ओढत नेऊन वाघाने ठार केले. सायंकाळच्या सुमारास संभाजी कुडमेथे हा घरी न आल्याने त्याचा शोध घेणे सुरू झाले. यावेळी त्याच्यावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची माहिती गावकऱ्यांनी वनविभागाला दिली. उपवनसंरक्षक के अभरणा व वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी संगीता कोकणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा सुरू केला आहे.
T1 (अवनी)वाघिणीला ठार केल्यानंतर तिच्या दोन बछड्यांना पकडण्याची मोहीम वन विभागाकडून सुरू करण्यात आली होती. यातील एक मादी बचडा पकडण्यात येऊन त्याला स्थलांतरित करण्यात आले. तर नर बचडा अद्यापही जंगलातच वावरत होता. तसेच पांढरकवडा भागातील जंगलालगत टिपेश्वर अभयारण्य असल्याने या भागातील वाघाने किंवा T1 वाघिणीच्या बछड्याने ही शिकार केली असल्याचे गावकर यात चर्चा सुरू आहे. मागील आठ ते दहा महिन्यापासून बिंदास शेतीमध्ये काम करीत असणाऱ्या शेतकऱ्यांना पुन्हा वाघाची दहशत निर्माण झाली आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.