यवतमाळ : यवतमाळमध्ये सहकुटुंब बाहेरगावी गेलेल्या एका भाजीपाला विक्रेत्याच्या घरात चोरी झाली ( Theft At Vegetable Seller House ) आहे. ही घटना रविवारी 11 डिसेंबर रोजी अरुणोदय सोसायटी यवतमाळ येथे उघडकीस आली. यामध्ये सोने-चांदी रोख असा एकूण 27 लाखांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे. दरम्यान चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद ( Theft CCTV Footage ) झाली आहे.
साहित्य अस्थाव्यस्थ : हिरालाल गया प्रसाद जयस्वाल असे घरपोडी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. आरोपी अरुणोदय सोसायटीत राहतात. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जयस्वाल कुटुंब हे काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. हीच संधी साधून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर शोधाशोध घेऊन मुद्देमाल लंपास केला. दरम्यान कुटुंबातील बाहेरगावी गेलेले काही सदस्य परत आल्यानंतर चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला.
डॉग सर्च पथकाला पाचरण : स्थानिक नागरिकांच्या मदतीने अवधूत वाडी पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा सुरू केला. यावेळी पोलिसांनी डॉग सर्च पथकाला पाचरण केले. चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तज्ञांद्वारे माहिती संकलित करण्यात आली. मात्र यामध्ये सोन्या चांदीचा ऐवज व लाखो रुपयांचा रोख मुद्देमाल चोरी ( Theft Goods Worth Lakh ) गेल्याची माहिती जयस्वाल कुटुंबीयांकडून देण्यात आली आहे.