यवतमाळ - येथील वणी विधानसभा मतदारसंघात इच्छुक उमेदवार डॉ. महेंद्र लोढा यांचे नाव आज थेट वंचित बहुजन आघाडीच्या यादीत आले. या मतदारसंघात गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सरचिटणीस म्हणून लोढा हे काम करतात. या नावामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा- उसेन बोल्टचा रेकॉर्ड १० महिन्यांपूर्वी आई बनलेल्या एलिसन फेलिक्सने मोडला
डॉ. लोढा हे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांचे मित्र आहेत. ते गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न करत आहेत. हा मतदारसंघ मूळ काँग्रेसचा आहे. या ठिकाणी याआधी 15 वर्ष कॉंग्रेसचे उमेदवार वामन कासावर निवडून आले होते. मागील काही निवडणुकीत हा मतदारसंघ एकवेळ शिवसेनेच्या ताब्यात गेला. तर मागील निवडणुकीत या ठिकाणी भाजपने बाजी मारली होती. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या इच्छुक उमेदवारांचे नाव आघाडीच्या यादीत न येता थेट वंचित बहुजन आघाडीच्या यादीत आल्याने उमेदवाराला सुद्धा घाम फुटला आहे.
हेही वाचा- शरद पवार आणि पाच आश्चर्य !
या संदर्भात डॉ. लोढा यांच्याशी संपर्क केला असता त्यानी मी वंचित बहुजन आघाडीकडे उमेदवारी मागितली नाही. मी मुलखात दिली नाही. माझा कुठलाच संपर्क झाला नाही. तरी थेट माझे नाव वंचितच्या यादीत कसे आले कळले नाही. मी महाआघाडीच्या उमेदवारीमध्ये आहे. मलाच आघाडीची उमेदवारी मिळणार आहे, हा माझा विश्वास आहे. मला माझा नेत्याच्या नेतृत्वावर विश्वास आहे. मी राज्याचा पदाधिकारी आहे. माझे नाव आल्याने आघाडीत बिघाडी करण्याचे काम वंचित करत असल्याचे डॉ. लोढा यांनी बोलताना सांगितले.