यवतमाळ - टाळेबंदीने व्यावसायिक हताश झाले आहेत. लहान व्यावसायिकांवर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील असाच एका लहान व्यावसायिक हातठेल्यावरून मास्क विक्रीच्या आडून लहानसहान स्टेशनरी विक्री सुद्दा करत होता. या हातगाडी चालकावर नगर पालिका कर्मचाऱ्यांनी कारवाई केली. त्यामुळे पथकाने हातगाडी तहसील कार्यालयात जमा केली. यावेळेत संतप्त हातगाडी चालक चक्क शासकीय वाहनासमोर झोपला.
पोलिसांचा वेळीच हस्तक्षेप -
पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने समोरील अनर्थ टळला. हा त्याचा व्हिडिओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. शासनाचा आदेश पाळून कारवाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांचेही बरोबर आहे. मात्र, पोटाची आग शमवण्यासाठी कष्टाने व्यवसाय करणाऱ्यांचीही काय चूक असा प्रश्न नागरिकांकडून विचाराला जात आहे.