ETV Bharat / state

मोरवाडी फाट्याजवळील 11 बैलांचा मृत्यू हत्या असल्याचा संशय - yavatmal news today

या जनावरांची निर्घृण हत्या करण्यात आली असावी, अशी शंका ग्रामस्थांनी व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती पुसद पोलिसांना देण्यात आली असून गो तस्करी करणाऱ्यांकडून ही हत्या केली असावी, असे बोलले जात आहे.

यवतमाळ बैलांचा मृत्यू
यवतमाळ बैलांचा मृत्यू
author img

By

Published : Aug 8, 2021, 8:11 PM IST

Updated : Aug 8, 2021, 8:19 PM IST

यवतमाळ - महागाव तालुक्यातील काळी दौलतखान ते पुसद मार्गवर मोरवाडी फाट्याजवळ अकरा बैल हे मृत अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या जनावरांची निर्घृण हत्या करण्यात आली असावी, अशी शंका ग्रामस्थांनी व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती पुसद पोलिसांना देण्यात आली असून गो तस्करी करणाऱ्यांकडून ही हत्या केली असावी, असे बोलले जात आहे.

दुर्गंधीमुळे घटना उघडकीस

मोरवाडी फाट्याजवळ रस्त्यालगतच्या जंगलात अकरा बैलांची मृतदेह आढळून आले. परिसरातील नागरिकांना दुर्गंधी येत असल्याने जाऊन पाहणी केली तर तिथे अकरा बैल मृतावस्थेत आढळून आले. यातील काही मृत जनावरांच्या अंगावर, गळ्यावर जखमा असल्याने तसेच पाय बांधलेले असल्याने त्या जनावरांची हत्या करण्यात आली असावी, असे निदर्शनास येत आहे. तसेच बैलांच्या पोटावरसुद्धा तीक्ष्ण हत्यारांने वार करण्यात आल्याचे दिसून येत आहे. ही जनावरे परिसरातील गावाची नसल्याचे बोलले जात आहे. ही जनावरे परगावातून चोरून आणून हे हत्याकांड घडवल्याचेही बोलले जात आहे. या घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच वनविभाग, पोलीस प्रशासन घटनास्थळी पोहोचले.

Last Updated : Aug 8, 2021, 8:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.