ETV Bharat / state

जिल्ह्यात टेस्टिंगचे प्रमाण वाढले; निगेटिव्ह रिपोर्टमध्येही वाढ - यवतमाळ कोरोना अपडेट

यवतमाळ जिल्ह्यात टेस्टिंगचे प्रमाण वाढले आहे. यामुळे जिल्ह्यात निगेटिव्ह रिपोर्टमध्ये वाढ झाली आहे.

Testing increased in Yavatmal district
जिल्ह्यात टेस्टिंगचे प्रमाण वाढले; निगेटिव्ह रिपोर्टमध्येही वाढ
author img

By

Published : May 4, 2021, 10:19 PM IST

यवतमाळ - कोरोनाविरुध्दच्या लढाईत ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रिटमेंट ही त्रीसूत्री अतिशय महत्वाची आहे. लवकर निदान झाले आणि त्यावर त्वरीत उपचार मिळाले तर आपला कोरोनापासून बचाव होऊ शकतो, याचे महत्त्व जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना समजले आहे. त्यामुळे लोक स्वत:हून टेस्टिंगसाठी समोर येत आहेत. परिणामी जिल्ह्यात टेस्टिंगच्या प्रमाणात वाढ झाली असून निगेटिव्ह रिपोर्टचा आकडाही वाढत आहे. 24 तासात जिल्ह्यात 7792 जणांचे निगेटिव्ह रिपोर्ट प्राप्त झाले आहेत.

जिल्ह्यात टेस्टिंगचे प्रमाण वाढले; निगेटिव्ह रिपोर्टमध्येही वाढ

एकाच 7792 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह -

आज 9109 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 1317 जण नव्याने पॉझिटिव्ह आले तर 7792 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. गत 24 तासात जिल्ह्यात 1204 जण कोरोनामुक्त झाले असून एकूण 19 मृत्यू झाले. यात इतर जिल्ह्यातील दोन मृत्यूंचा समावेश आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 15 मृत्यू, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये दोन आणि खासगी रुग्णालयात दोन मृत्यू झाले आहेत.

सद्यस्थितीत जिल्ह्यात 6795 रुग्ण ॲक्टिव्ह पॉझेटिव्ह आहेत. आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 57, 476 झाली आहे. जिल्ह्यात एकूण 1,373 मृत्यूची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी दर 12.99 असून मृत्यूदर 2.39 आहे. सुरूवातीपासून आतापर्यंत 442601 नमुने पाठविले असून यापैकी 438339 प्राप्त तर 4262 अप्राप्त आहेत 380803 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

नागरिकांत वाढली जागृतता -

कोरोनाच्या सुरवातीच्या काळात नागरिकांमध्ये टेस्टिंग करण्याबाबत मोठ्या प्रमाणात भीती होती. त्यामुळे लक्षणे असली तरी नागरिक चाचणी करण्यास नकार देत होते. मात्र, नागरिकांमध्ये जागरुकता वाढली आहे. त्यामुळे लोक स्वत:हून टेस्टिंग करत आहेत. नागरिकांचा असाच प्रतिसाद राहिला तर कोरोनावर नक्कीच मात करता येईल. यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.