यवतमाळ - महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री यशोमती ठाकूर यांनी राज्यपाल विक्षिप्त असल्याचे वक्तव्य केले होते. त्यांचे हे वक्तव्य चुकीचे नाही. कारण यशोमती ठाकूर हे राज्यपाल यांचा कारभार, परिस्थिती जवळून पाहत आहे. त्यांच्या शब्दांकडे लक्ष न देता त्यांच्या भावना काय आहेत हे आपण बघितले पाहिजे, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी दिली.
राज्यपाल एखाद्या पक्षाच्या अध्यक्षांप्रमाणे वागतात -
राज्यपाल एखाद्या पक्षाच्या अध्यक्षा प्रमाणे वागत आहे. नागरिकांना राज्यपाल हे कुठल्या पक्षचे नसून जनतेला व पक्षांना न्याय मिळेल, अशी भूमिका राज्यपालांची असली पाहिजे. मात्र, असे होताना दिसत नाही. असेही माणिकराव ठाकरे यांनी म्हटले.
काय म्हणाल्या होत्या यशोमती ठाकूर -
सांगली जिल्ह्यातील कृषी विद्यालयाच्या मागणीवरून बोलताना यशोमती ठाकूर यांनी कृषी मंत्री दादाजी भुसे यांचा हवाला देत, "दादांनी मला सांगितले, एक विक्षिप्त माणूस राज्याच्या राज्यपालपदी बसला आहे. ती व्यक्ती मीडियावाल्यांना असे दाखवते की आपण संविधानाने जोडले गेलो आहे. पण संविधानावर प्रश्न निर्माण करून मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारणारा माणूस राज्यपाल म्हणून बसला आहे. याठिकाणी कृषी विद्यालय निर्माण करण्यासाठी ते अडचणी आणत आहेत," असा आरोप मंत्री यशोमती ठाकूर यांनी यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर केला होता.
हेही वाचा - 'मार्चच्या पहिल्या आठवड्यात सादर करणार राज्याचा अर्थसंकल्प'