यवतमाळ - संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरू डॉ. राजेश जयपूरकर यांनी केलेल्या अक्षम्य चुकीबद्दल विद्यार्थी, शिक्षक, संशोधन, विकासाचे अतोनात नुकसान होत आहे. याची माहिती घेऊन राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी त्यांना तत्काळ निलंबित करावे, अशी मागणी अमरावती विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. दिनेश सूर्यवंशी यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा नुकताच 248 कोटींचा सन 2021-22 चा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पामधून ज्याबाबी समोर येत आहेत त्यामुळे विद्यार्थी, शिक्षकात मोठ्या प्रमाणावर संताप आणि चीड व्यक्त केली जात आहे. यामुळे विद्यार्थी, संशोधन, विकासाचे यासह विद्यापीठाच्या इतर विभागांचे नुकसान झाले आहे. विद्यापीठाच्या अर्थसंकल्पामध्ये विद्यार्थ्यांसाठी व शिक्षकांसाठी ज्या तरतुदी केल्या आहेत त्या कुठेच खर्ची पडलेल्या नाहीत.
विद्यार्थ्यांच्या हिताचे कुठलेच निर्णय नाहीत
विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर नाविन्यपूर्ण व्यवसाय केंद्रे, एनएसएसचे कार्यक्रम, विद्यापीठाच्या माध्यमातून विद्यार्थी कल्याणाचे कार्यक्रम असतील यासाठी निधी या राखीव केला जातो या राखीव केलेल्या निधीचा उपयोग विद्यार्थ्यांना रोजगार सक्षम बनविणे त्यांना नोकऱ्या देण्यासाठी त्यांना प्लेसमेंट देण्यासाठी विचार केलेला असतो या कुठल्याच बाबीवर विद्यापीठ काम करीत नाही तसेच शासनाकडे कुठलेही प्रस्ताव दाखल केलेला नाही युजीसी कडून जे पत्र येतात की या प्रकारचे प्रस्ताव सादर करावे. आम्ही अनुदान देतो. पण असे प्रस्ताव सुद्धा विद्यापीठ करीत नाही. त्यामुळे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर व प्र-कुलगुरू डॉ. राजेश जयपुरकर यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी राज्यपालांकडे करण्यात आली.