यवतमाळ - महागाव तालुक्यातील परसराम कनिराम राठोड (करंजीखेड) यांना काही दिवसापासून ताप, खोकला, उलटी आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे 10 एप्रिल रोजी रात्री दहा वाजता मेडिकल कॉलेज येथे ते स्वत: भरती झाले होते. त्यांचा 11 एप्रिलला रात्रीच्या सुमारास मृत्यू झाला होता. त्यांचे नमूने लगेच नागपुरला पाठविण्यात आले. मात्र, त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला, अशी माहिती जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी दिली आहे.
मृत व्यक्तीला श्वसनाचा त्रास आणि न्युमोनिया असल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. शहरामध्ये 8 कोरोनाबाधित रुग्ण यवतमाळ जिल्हा वैद्यकीय रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डमध्ये उपचार घेत आहेत. महागाव येथील रुग्णाचा रिपोर्ट नागपूर येथील मेयो रुग्णालयातून रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने जिल्हा प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. तो कोरोन बाधित असल्याचा संशय असल्याने काल त्याचा राहत्याघरी आरोग्य यंत्रणा गेली असून, घरातील व आजूबाजूच्या सर्वांची तपासणी करण्यात आली होती.