ETV Bharat / state

'हा' विद्यार्थी करतोय आदिवासी वारली चित्रकलेची संस्कृती जपण्याचा प्रयत्न - वारली चित्र कशी काढतात

वारली चित्रकला ही महाराष्ट्रातील कोकण विभागातील वारली या आदिवासी जमातीची वैशिष्ट्यपूर्ण चित्रशैली आहे. डहाणू आणि पालघर जिल्ह्यातील परिसरात राहणार्‍या वारली जनजातींची ही चित्रे जगप्रसिद्ध झाली आहेत.

वारली चित्रकला
वारली चित्रकला
author img

By

Published : Aug 10, 2020, 2:48 PM IST

Updated : Sep 3, 2020, 7:57 PM IST

यवतमाळ - जिल्ह्यातील दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला वारली चित्रकला बघून काही नवे करण्याची कल्पना सुचली. लॉकडाऊनकाळात त्याने आपल्या फावल्या वेळेत 'आदिवासी वारली मॉडेल' तयार करून आदिवासींची जीवन पद्धती आणि संस्कृती समाजासमोर आणण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे, त्याने ही कलाकृती फक्त वर्तमानपत्र आणि वॉटर कलरचा वापर करून तयार केली आहे. जिमी वाळके असे या विद्यार्थ्याचे नाव आहे.

वारली चित्रकले विषयी माहिती देताना जिमी शेलके

'आमची संस्कृती, आमचा अभिमान, मी आदिवासी माझा स्वाभिमान' अशी परंपरा असलेली आदिवासी कला सातासमुद्रापार पोहोचली. मात्र, या समाजाचा विकास अजून झालेला नाही. वारली चित्रकला ही महाराष्ट्रातील कोकण विभागातील वारली या आदिवासी जमातीची वैशिष्ट्यपूर्ण चित्रशैली आहे. डहाणू आणि पालघर जिल्ह्यातील परिसरात राहणार्‍या वारली जनजातींची ही चित्रे जगप्रसिद्ध झाली आहेत. 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिवस म्हणून दरवर्षी जगभर साजरा केला जातो. अशातच यवतमाळच्या जिमी वाळके या दहावीतील विद्यार्थ्याने वारली चित्रकला बघून काही नवे करण्याचे ठरवले. लॉकडाउनकाळात त्याने आपल्या फावल्या वेळेत आदिवासी वारली मॉडेल तयार करून आदिवासींची जीवन पद्धती आणि संस्कृती समाजासमोर आणण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे त्यांनी ही कलाकृती फक्त वर्तमानपत्र आणि वॉटर कलरचाच वापर करून तयार केली आहे. दरम्यान, त्याच्या या प्रयोगाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

warli painting
वारली चित्रकला

हेही वाचा - मास्क वापरा; सोलापुरमध्ये 'दिव्य कासव' कलाकृतीद्वारे जनजागृती

jimi walke
जिमी वाळके

Last Updated : Sep 3, 2020, 7:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.