यवतमाळ - 'प्रवाशांच्या सेवेसाठी' हे ब्रीदवाक्य असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने 1 जून रोजी अमृत महोत्सव साजरा केला. मात्र या लालपरीची दुरावस्था अद्यापही संपलेली नाही. पावसाळ्यात तर या लालपरीची दुरावस्था वाखावण्याजोगी आहे. बसमध्ये पावसाळ्यात गळतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होत असल्याने प्रवाशांना मोठी अडचण निर्माण होत आहे.
सर्वसामान्य माणुस दळणवळणासाठी एसटी बसचा वापर करतो. मात्र सरकारच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे या लालपरीची अत्यंत दुरावस्था झाली आहे. शिवशाही सारख्या वातानुकुलित गाड्या फक्त श्रीमंतांना परवडणाऱ्या आहेत. पण सामान्य माणुस साध्या बसेसनेच प्रवास करतो. त्या गाड्यांची किती दुरावस्था झाली आहे हे यवतमाळ जिल्ह्यातील नेर आगाराची बस (MH 40 8827) मधून दिसून येते. ही बस अमरावतीहुन नेर येथे जात असतांना रस्त्यात पाऊस लागला. आणि या बस मध्ये सर्वबाजुने पाणी गळायला लागले. बघता बघता सर्व एसटी ओली झाली. यावेळी प्रवाशांची मात्र तारांबळ उडाली. परिवहन मंत्री दिवाकर रावते याकडे लक्ष देतील का हा प्रश्न सर्वात महात्वाचा आहे.
जिल्ह्यामध्ये नऊ आगार
यवतमाळ जिल्ह्यामध्ये यवतमाळ, नेर, दारव्हा, राळेगाव, पांढरकवडा, वनी, उमरखेड, पुसद आणि दिग्रस असे नऊ आगार आहेत. या आगारांमध्ये हजारावर बसेसची संख्या आहेत. मात्र यातील 50 टक्के बसेसची कालमर्यादा संपुष्टात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करत या बसेस मधूनच प्रवास करावा लागत आहे.