यवतमाळ - दीपावलीच्या शुभ पर्वावर बहीण भावाचं पवित्र नातं दृढ करणारा भाऊबीज हा सण घरोघरी उत्साहात साजरा करण्यात येतो. समाजातील वंचित, निराधार व्यक्तींच्या वाट्याला हे क्षण प्रत्येकवेळी येत नाहीत. मात्र निराधार वृद्धांसोबत दारव्हा येथील दुधे दाम्पत्याने मित्र परिवारासोबत आर्णी तालुक्यातील उमरीपठार येथील संत श्री डोला महाराज वृद्धाश्रमात भाऊबीज साजरी करून आदर्श निर्माण केला.
रक्ताच्या नात्यापलीकडचे नाते; दुधे दाम्पत्याची वृद्धाश्रमात अनोखी भाऊबीज - bhaubeej in yavatmal
दीपावलीच्या शुभ पर्वावर बहीण भावाचं पवित्र नातं दृढ करणारा भाऊबीज हा सण घरोघरी उत्साहात साजरा करण्यात येतो. समाजातील वंचित, निराधार व्यक्तींच्या वाट्याला हे क्षण प्रत्येकवेळी येत नाहीत. मात्र निराधार वृद्धांसोबत दारव्हा येथील दुधे दाम्पत्याने मित्र परिवारासोबत आर्णी तालुक्यातील उमरीपठार येथील संत श्री डोला महाराज वृद्धाश्रमात भाऊबीज साजरी करून आदर्श निर्माण केला.
रक्ताच्या नात्यापलीकडचे नाते; दुधे दाम्पत्याची वृद्धाश्रमात आगळवेगळी भाऊबीज
यवतमाळ - दीपावलीच्या शुभ पर्वावर बहीण भावाचं पवित्र नातं दृढ करणारा भाऊबीज हा सण घरोघरी उत्साहात साजरा करण्यात येतो. समाजातील वंचित, निराधार व्यक्तींच्या वाट्याला हे क्षण प्रत्येकवेळी येत नाहीत. मात्र निराधार वृद्धांसोबत दारव्हा येथील दुधे दाम्पत्याने मित्र परिवारासोबत आर्णी तालुक्यातील उमरीपठार येथील संत श्री डोला महाराज वृद्धाश्रमात भाऊबीज साजरी करून आदर्श निर्माण केला.
कोणत्याही सणामध्ये आपले कुटुंब सोबत असावे, असे सर्वांना वाटत असते. मात्र, निराधार या आनंदापासून वंचित राहतात. निराधार वंचित वृद्धांसाठी हा क्षण नक्कीच स्मरणीय ठरला आहे. मागील दहा वर्षांपासून दुधे दाम्पत्य वृद्धाश्रमात भाऊबीज साजरी करतात. यावेळी दारव्हा येथील डॉ. एन. डी. ठाकरे व अरुणा ठाकरे यांनी सुद्धा त्यांच्या सोबत भाऊबीज साजरी केली. वृद्धाश्रमाचे संचालक सेवाव्रती शेषराव डोंगरे यांनी दुधे व ठाकरे परिवाराचे कौतुक केले.