ETV Bharat / state

यवतमाळमध्ये 65 जण कोरोनामुक्त; 39 नवे कोरोना रुग्ण - Yavatmal latest news

यवतमाळ जिल्ह्यात शनिवारी 65 जण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात 39 कोरोना रुग्ण वाढले आहेत. जिल्ह्यात 29 जणांचा मृत्यू झाला आहे.

Yavatmal corona update
यवतमाळ कोरोना अपडेट
author img

By

Published : Aug 2, 2020, 9:15 AM IST

यवतमाळ-वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड तसेच जिल्ह्यातील विविध कोव्हिड केअर सेंटरमध्ये भरती असलेले 65 जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात दोन कोरोनाबाधित रुग्णांचा शनिवारी मृत्यू झाला आहे. दिवसभरात 39 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे.

शनिवारी मृत्यू झालेल्या दोन जणांमध्ये एक जण यवतमाळ शहरातील तेलीपुरा येथील 60 वर्षीय पुरुष आणि दुसरा व्यक्ती दिग्रस शहरातील वॉर्ड क्रमांक 1 येथील 70 वर्षीय पुरुष आहे. जिल्ह्यात एकूण मृत्युची संख्या 29 झाली आहे.

39 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 19 पुरुष व 20 महिलांचा समावेश आहे. यामध्ये यवतमाळ शहरातील कोहिनूर सोसायटी येथील एक पुरुष, नेहरू चौक येथील एक पुरुष, तेलीपुरा येथील एक पुरुष, प्रजापती नगर येथील एक पुरुष व एक महिला, पिंपळगाव येथील एक पुरुष, गजानन नगर येथील एक महिला तसेच यवतमाळ शहरातील आणखी एक महिला, दिग्रस शहरातील एक पुरुष व एक महिला, पांढरकवडा शहरातील शिवाजी नगर येथील एक पुरुष तसेच पांढरकवडा शहरातील चार पुरुष व तीन महिला, पुसद शहरातील बारी नगर येथील एक पुरुष, पुसद शहरातील गोकूल नगर येथील दोन महिला, आर्णि शहरातील पाच पुरुष व नऊ महिला, महागाव शहरातील एक पुरुष व एक महिला, वणी शहरातील एक पुरुष व एक महिला यांचा समावेश आहे.

जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत अ‌ॅक्टिव्ह रुग्णसंख्या 451 होती. शनिवारी 41 रुग्णांची भर पडल्याने हा आकडा 492 वर पोहोचला. दिवसभरात 65 जण कोरोनामुक्त झाले. सद्यस्थितीत जिल्ह्यात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 425 आहे.

जिल्ह्यात सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1115 झाली आहे. यापैकी 661 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 29 मृत्युची नोंद झाली आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 102 जण भरती आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरुवातीपासून आतापर्यंत 18006 नमुने पाठविले असून यापैकी 14730 प्राप्त तर 3276 अप्राप्त आहेत. 13615 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.