यवतमाळ - शिवसेनेचे आमदार संजय राठोड व खासदार भावना गवळी यांना धक्का बसला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Party leader Uddhav Thackeray ) यांच्या आदेशाने यवतमाळ जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर ( Appointments of Shiv Sena officials announced ) करण्यात आल्या आहेत. अशी माहिती मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. संजय राठोडच्या मतदारसंघातील ( Sanjay Rathore Constituency ) दारव्हा, दिग्रस ,नेर ,मधील शिवसेना पदाधिकारींच्या नव्याने केल्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
शिवसेना मध्यवर्ती कार्यालयालातून नियुक्त्या जाहीर - संजय राठोड भावना गवळी समर्थकांच्या जागी नव्याने नियुक्त्या करण्यात आले आहे. तर जिल्हा सहसंपर्क प्रमुख पदी माजी आमदार बाळासाहेब मुनगिनवार , दारव्हा तालुका प्रमुखपदी अजय गाडगे , नेर तालुका प्रमुखपदी नितीन माकोडे, दिग्रस तालुका प्रमुखपदी यादव पवार यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे. तर यवतमाळ शहर प्रमुख नगरसेवक पिंटू बांगर यांच्या जागी निलेश बेलोकार ,योगेश भांदककर यांची नियुक्ती तर आर्णी तालुका प्रमुखपदी मनोज ढगले, पांढरकवडा तालुका प्रमुखपदी तिरुपती करकुंदिवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यापूर्वीच प्रतोद पदावरुन भावना गवळीची उचलबांगडी - खासदार भावना गवळी यांनी लोकसभा शिवसेनेच्या प्रतोद पदावरुन उचलबांगडी करण्यात आली ( Bhavana Gawali Removed Loksabha Chip Whip ) आहे. गवळींच्या जागी खासदार राजन विचारे यांची प्रतोद पदी नियुक्ती करण्यात आली ( ShivSena Appoints Rajan Vichare As Chief Whip ) आहे. महाराष्ट्रातील शिवसेनेच्या 40 आणि काही अपक्षांनी बंडखोरी केली होती. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यामुळे आता शिवसेना सावध झाली आहे. राष्ट्रपती निवडणूक आणि पावसाळी अधिवेशनापूर्वी शिवसेनेने लोकसभेतील आपला प्रतोद बदलला आहे. खासदार भावना गवळी यांनी लोकसभा शिवसेनेच्या प्रतोद पदावरुन हकालपट्टी करण्यात आली ( Bhavana Gawali Removed Loksabha Chip Whip ) आहे. यासंदर्भात शिवसेना संसदीय नेते संजय राऊत यांनी केंद्रीय संसदीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहलं आहे. गवळींच्या जागी खासदार राजन विचारे यांची प्रतोद पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
बंडखोरांवर कारवाई न करण्याची केली होती विनंती - भावना गवळींनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. त्यांनी पत्रात म्हटले होते, की सद्यस्थितीत निर्माण झालेल्या राजकीय परिस्थीतीमुळे आपण व्यतीथ झाला आहात. पक्षापुढे अचानकपणे आलेल्या संकटामुळे आपणासमोर खुप मोठे आव्हाण असल्याची कल्पना मला आहे. एक शिवसैनिक म्हणून माझ्या मनातही याची खंत आहे. आपल्या पक्षातील मावळे आमदार हिंदुत्वाच्या मुद्यावर आपणास एक मोठा निर्णय घेण्याकरीता विनंती करीत आहेत. हे सर्व शिवसेनेचे शिलेदार प्रथमतः हाडामासाचे शिवसैनिकच आहेत. त्यांच्या भावना समजून आपण त्यांच्यावर कुठलीही कठोर कार्यवाही न करता कठीन असला तरी शिवसेनेकरीता निर्णय घ्यावा, हीच नम्र विनंती. असे भावना यांनी पत्रामध्ये नमूद केले आहे.
हेही वाचा : Bhavana Gawali : महाराष्ट्रातील झटक्यानंतर शिवसेना सावध; प्रतोद पदावरुन भावना गवळींची उचलबांगडी