ETV Bharat / state

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यवतमाळ दौऱ्यावर, आक्रोश मोर्चात होणार सहभागी - कृषी वीज जोडणी योजना

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) उद्या यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर ( Uddhav Thackeray Yavatmal Visit ) येणार आहेत. तसेच उद्धव ठाकरे आक्रोश मोर्चात ( Yavatmal protest march ) होणार सहभागी होणार आहेत

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray
author img

By

Published : Jan 8, 2023, 9:25 PM IST

मुंबई - शिवसेनेतील फुटीनंतर एकीकडे आरोप- प्रत्यारोप होत असताना उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) पक्ष बांधणीवर जोर दिला आहे. या पार्श्वभूमीवर उद्या ठाकरे यवतमाळ दौऱ्यावर ( Uddhav Thackeray Yavatmal Visit ) असून जिल्ह्यातील आक्रोश मोर्चात सहभागी होणार आहेत. दरम्यान, कर्जमाफी, कृषी वीज जोडणी, पीक विमा आदी मुद्द्यांवरून शिंदे गट, भाजपबद्दल काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शेतकऱ्यांना त्वरित कर्जमाफी - सन २०१७ साली झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेअंतर्गत वंचित राहिलेल्या १ लाख २८ हजार शेतकऱ्यांना त्वरित कर्जमाफी ( Immediate loan waiver for farmers ) देण्यात यावी. नियमित पीककर्ज ( Crop loan ) फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान त्वरीत मिळावे. २०१८ पासून बंद असलेली कृषी वीज जोडणी योजना ( Agricultural Electricity Connection Scheme ) त्वरित चालू करावी. विहिरी दुरूस्तीसाठी खचलेल्या बुजलेल्या विहीरीसाठी अनुदान मिळावे आदी प्रमुख मागण्यांसह ठाकरे यवतमाळमध्ये असणार आहे.

शिवसेना आक्रमक - यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी, कृषी वीज जोडणी, पीक विमा आदी शेतकऱ्यांच्या मागण्या त्यांच्या विविध समस्यांना शासनदरबारी वाचा फोडण्यासाठी शिवसेना आक्रमक झाली असून उद्या आक्रोश मोर्चा काढणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या मोर्चात सामील होऊन, स्थानिकांच्या मागण्यांबाबत आवाज उठवणार आहेत. यवतमाळ जिल्ह्याच्यातील आक्रोश मोर्चाकडे विरोधकांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, शिवसेना गटांच्या याचिकांवर निवडणूक आयोग १२ जानेवारीला सुनावणी घेणार आहे. याबाबत राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी रविवारी सांगितले की, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना एकच आहे. त्याचबरोबर दोन्ही गटांचा युक्तिवाद ऐकून निवडणूक आयोग न्याय देईल, अशी आशा आहे. ‘खरी शिवसेना’ नेमकी कोणाची हा प्रश्न जनतेच्या मनात कायम आहे.

जूनमध्ये शिवसेनेत फूट - जूनमध्ये शिवसेनेत फूट पडली होती. एक गट उद्धव ठाकरेंसोबत तर, दुसरा एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेला होता यावरुन उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देखील द्यावा लागला होता. ‘खारी शिवसेना’ नेमकी कुणाची यावरून दोन गटांमध्ये कायदेशीर युद्ध सुरू आहे.

"निवडणूक आयोगावर आमचा विश्वास आहे" प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, "शिवसेनेची स्थापना एकट्या बाळासाहेब ठाकरेंनी केली असून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण शिवसेना त्यांच्या पाठीशी आहे. निवडणूक आयोगाला आम्ही स्वायत्त, स्वतंत्र संस्था मानतो असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.