यवतमाळ - आरक्षणाच्या मुद्द्याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी आज 'सेव मेरिट - सेव नेशन' मोहिमेंतर्गत आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या यवतमाळातील निवासस्थानासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी मंत्रीमहोदयांना निवेदनाच्या माध्यमातून आपल्या मागण्या लावून धरल्या.
आरक्षणाची मर्यादा 50 टक्केपेक्षा अधिक असू नये, महाराष्ट्र सरकारने गुणवंत व प्रतिभावंतना संरक्षण द्यावे. या मागण्या शासन दरबारी पोहचावा म्हणून 'सेव मेरिट - सेव नेशन' मोहिमेंतर्गत डॉ. अशोक उईके यांच्या निवासस्थानसमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शहरातील महिला, पुरुष तथा विध्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आंदोलन कर्त्यांनी हातात मागण्याचे फलक घेऊन जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनादरम्यान उईके यांनी आंदोलकांशी चर्चा करून मागण्या समजून घेतल्या. आंदोलकांच्या मागण्या शासन दरबारी मांडणार असून या आंदोलनाला राजकीय स्वरूप येऊ देऊ नका, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.