यवतमाळ - पुसद तालुक्यातील जमशेदपूर येथे एका 14 वर्षीय मुलीचा वीज पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. समीक्षा पिंटू जाधव असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. ही घटना आज (10 जून) सायंकाळच्या सुमारास घडली.
शेतात करत होती कपाशीची लागवड
समीक्षा तिच्या आई-वडिलांसोबत कापूस पिकाची लागवड करण्यासाठी मदत करत होती. यावेळी अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. सोबतच विजांचा कडकडाटही सुरू झाला. यादरम्यान, अचानक तिच्या अंगावर वीज कोसळली. त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. याबाबत समीक्षाच्या आई-वडिलांनी आरडाओरड केली. मग परिसरातील इतर शेतकरी जमा झाले. याबाबतची सूचना प्रशासनाला देण्यात आली.
दरम्यान, पुसदचे तहसीलदार अशोक गिते यांनी पंचनामा केला. तसेच, समीक्षाच्या कुटुंबाला शासनाकडून तत्काळ मदत मिळावी यासाठी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा - Mystery Girl.. घरात आली तेव्हा १८ वर्षांची, घराबाहेर पडली तेव्हा २८ वर्षांची, वाचा रहस्यमयी कहाणी