ETV Bharat / state

Roof Collapsed Yawatmal : खाणीतील स्फोटामुळे यवतमाळातील मंगोली गावाला हादरे; ग्रामस्थांनी केली 'ही' मागणी

शुक्रवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास मुंगोली कोळसा खाणीत स्फोट घडविण्यात आले. यामुळे गावाला हादरे बसले. तसेच गावातील काही घरांचे छप्पर कोसळले. ( Roof Collapsed Yawatmal )

Roof Collapsed Yawatmal
खाणीतील स्फोटामुळे यवतमाळातील मंगोली गावाला हादरे
author img

By

Published : Dec 11, 2021, 6:59 PM IST

Updated : Dec 11, 2021, 7:45 PM IST

यवतमाळ - वणी तालुक्यातील कोळसा उत्खननासाठी खाणीत केल्या जाणाऱ्या स्फोटामुळे तालुक्यातील मुंगोली गावाला हादरे बसू लागले आहेत. मुंगोली खाणीत स्फोट करण्यात आले. ( Explosion in the Mine Mangoli ) त्यामुळे गावातील काही घरांचे छप्पर कोसळले. ( Roof Collapsed Yawatmal ) तर काही घरांच्या भिंतींना तडे गेले. सततच्या या घटनांमुळे गावकरी दहशतीत आहेत.

याबाबत बोलताना ग्रामस्थ

शुक्रवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास मुंगोली कोळसा खाणीत स्फोट घडविण्यात आले. यामुळे गावाला हादरे बसले. गावातील शारदा विलास मासीरकर यांच्या घराचे छप्पर कोसळले. सुदैवाने यावेळी त्याठिकाणी कुणीही नसल्यामुळे जीवितहानी टळली. यासोबत गावातील इतर घरांच्या भिंतींनाही तडे गेले आहेत. हा प्रकार गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने सुरू आहे. यासंदर्भात अनेकदा तक्रारी करूनही कोणतीच कारवाई होत नसल्याने गावकरी संतप्त आहेत.

मुंगोलीचे पुनर्वसन कधी होणार -

प्रशासनाच्या चालढकल धोरणामुळे अद्यापही मूल्यांकन सादर करण्यापर्यंतच काम झाले आहे. त्याची पुढील प्रक्रिया धिम्या गतीने सुरू आहे. जोपर्यंत एखाद्याचा जीव जाणार नाही तोपर्यंत या गावाचे पुनर्वसन होणार की नाही, असा संतप्त सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे. या गावाला फक्त स्फोटामुळे हादरेच बसत नाही, तर या गावाजवळून होणाऱ्या कोळशाच्या वाहतुकीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गावकऱ्यांना सातत्याने धूळमुळे वायू प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे. त्यांना विविध आजारांची बाधा होत आहे. वेळी-अवेळी होणारे स्फोट गावकऱ्यांसाठी धोकादायक ठरत आहेत. हा प्रकार बंद करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. ( Mangoli Citizens Demand )

घरांची दुरुस्तीची मागणी -

मुंगोलीच्या सरपंच रेश्मा शंकर आत्राम, सदस्य मीनाक्षी दीपक घुंगरुड, शर्मीला हरिदास तुमाने, सामाजिक कार्यकर्ते आयुष रोहिदास ठाकरे, अक्षय बलकी, अविनाश बाचुलकर, आदींनी मुंगोलीच्या उपक्षेत्रीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. ज्या घरांचे छप्पर कोसळले, त्याची दुरुस्ती करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. तसेच यासंदर्भातील निवेदनही यावेळी देण्यात आले. स्फोटामुळे गावात जीवितहानी झाली तर त्याला वेकोली प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. आता वेकोली प्रशासन काय भूमिका घेते, याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Last Updated : Dec 11, 2021, 7:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.