ETV Bharat / state

धनदांडग्यांनी जबरदस्तीने बैलगाडी घुसवून शेतकऱ्याच्या शेती पिकांचे केले नुकसान

शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याच्या कारणावरून धनदांडग्या लोकांनी जबरदस्ती एका शेतकऱ्याच्या शेतात बैलगाडी घुसवून रस्ता तयार करण्याचा प्रयत्न केला. यामुळे शेतकऱ्याच्या पिकांचे नुकसान झाले आहे.

author img

By

Published : Jul 8, 2019, 3:55 PM IST

जबरदस्ती एका शेतकऱ्याच्या शेतात बैलगाडी घुसवून रसता तैयार करण्याचा प्रयत्न करताना लोकं

यवतमाळ- शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याच्या कारणावरून धनदांडग्या लोकांनी जबरदस्ती एका शेतकऱ्याच्या शेतात बैलगाडी घुसवून रसता तैयार करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या शेतकऱ्याच्या पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी या बाबतीत उमरखेड तहसिलदार आणि बिटरगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

जबरदस्ती एका शेतकऱ्याच्या शेतात बैलगाडी घुसवून रसता तैयार करण्याचा प्रयत्न करताना लोकं

जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील निंगणुर येथे मारुती कर्हे आणि दत्ता कर्हे या दोन भावांची साधारणत: साडेतीन एकर शेती आहे. शेतामध्ये ओलित व्यवस्था असल्याने ते बारमाही उत्पन्न घेतात. यंदा त्यांनी शेतात सोयाबीन, केळी, भेंडी आदी पिकांची लागवड केली आहे. मात्र, गावातीलच काही श्रीमंत धनदांडग्या लोकांनी त्यांच्या शेतात जाण्यासाठी कर्हे बंधुंच्या शेतातून रस्ता जवळ पडतो म्हणून बैलगाडी थेट त्यांच्या शेतात शिरवली व पिकांची नासधूस करत बैलगाडीने रस्ता तयार करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे यासंदर्भात निंगणुर गावातील पोलीस पाटील आणि गावाचे सरपंच व इतर लोकांनी धनदांडग्या लोकांना असे न करण्यास सांगितले होते. मात्र, त्यांच्या सांगण्याला न जुमानता सर्व १९ धनदांडग्यांनी एकत्र येत कर्हे यांच्या शेतातून वाट काढण्याचा प्रयत्न केला. यात शेतकऱयाचे मोठे नुकसान झाले.

विशेष म्हणजे या १९ जणांमध्ये स्त्री-पुरूष दोन्ही असल्याचे शेतकऱ्यानी सांगितले आहे. या लोकांनी शेतकऱ्याला जे होईल ते पाहून घेऊ म्हणत त्याच्या शेतातून बैलगाडी नेत रस्ता तयार करण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात शेतकऱ्यांनी उमरखेड येथील तहसीलदार व बिटरगाव पोलीस स्टेशन यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. आणि झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे. ज्या लोकांनी या शेतकऱ्यांचे नुकसान केले ती सर्व गावातीलच लोकं आहेत. या सर्व घटनेचा व्हिडिओ शेतकऱ्यांनी स्वतः रेकॉर्ड केला आहे.

Intro:धनदांडग्यानि जबरदस्ती बैलगाडी नेऊन शेतकऱ्याच्या शेती पिकांचे केले नुकसान Body:यवतमाळ : धनदांडग्या लोकांच्या शेतात जाण्यासाठी जवळुन रस्ता नाही. तसेच शेतात जायचे असल्यास त्यासाठी थोडा फेरा पडते म्हणून एका शेतकऱ्याच्या शेतातुन रस्ता नसतानाही धनदांडग्या लोकांनी जबरदस्ती बैलगाडी घेऊन जाऊन शेतकऱ्याच्या शेती पिकांचे नुकसान केल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे .
जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील निंगणुर येथील ही गंभीर बाब पुढे आली आहे.
येथे मारुती कर्हे आणि दत्ता कर्हे हे दोन भावंडं साधारण साडेतीन एकर शेतात मागील अनेक वर्षापासून शेती करत आहेत. शेतामध्ये ओलित व्यवस्था असल्याने ते बारमाही उत्पन्न घेतात. मात्र, यंदा या शेतात त्यांनी सोयाबीन, केळी ,भेंडी आदी पिकांची लागवड केली. मात्र गावातीलच काही श्रीमंत धनदांडग्या लोकांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी जवळचा मार्ग पडते, म्हणून या कारणाने मारोती आणि दत्ता यांच्या शेतातून थेट बैलबंड्या शिरवुन पिकांची नासधूस करत बैलगाडी रस्ता तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे यासंदर्भात निंगणुर गावातील पोलिस पाटील आणि गावातील सरपंच आधी व्यक्तींनी असं करू नये असे धनदांडग्या लोकांना सांगितलं. मात्र त्यासर्वानी कुणालाच न जुमानता ते यासर्वनी 19 लोकांनी एकत्र येत त्यांनी या शेतकऱ्यांच्या शेतातून वहिवाट रस्ता नसतानाही केवळ त्यांचे शेत या शेतकऱ्यांच्या शेतातून जर गेलं तर जवळ पडते याच कारणातून नुकसान केले आहे.
विशेष म्हणजे या घटनेस्थळीं साधणार 19 महिला पुरुष होते. असे संबंधित शेतकरी म्हणत असून या सर्वांनी त्या शेतकऱ्याला जे होईल ते पाहून घेऊ म्हणून त्या शेतकऱ्याला मनाई केली. तरी त्याच्या शेतातून बैलगाडी घेऊन रस्ता तयार करण्याचा प्रयत्न केला. बैलगाडी घेऊन गेल्याने बैलांच्या पीक तुडविले या सर्व संदर्भात या शेतकऱ्यांनी तहसीलदार उमरखेड यांच्याकडे तसेच पोलीस स्टेशन बिटरर्गाव यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. आणि झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई मिळावी. अशी मागणी केली आहे. ज्या लोकांनी या शेतकऱ्यांच्या शेतातून बैलगाड्या घेऊन जाऊन नुकसान केले. अशा सर्व लोक त्याच गावातील लोक आहेत. दमदाटी करीत त्यांनी या शेतकऱ्यांच्या शेतातून बैलगाडी घेऊन गेलेले आहेत त्या सर्व संदर्भाचा व्हिडिओ त्यात शेतकऱ्यांनी स्वतः रेकॉर्ड केला असून या संदर्भाची तक्रार त्यांनी तहसीलदार यांच्याकडे दाखल केली आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.