ETV Bharat / state

काळ्या बाजारात जाणारा तांदुळ जप्त, 23 लाख 94 हजारांचा मुद्देमाल ताब्यात - जैन वे ब्रीज

स्वस्त धान्य दुकानात जाणाऱ्या तांदळाचे काळा बाजार होत असून अवैधरित्या तांदुळ एका टेम्पोमधून ट्रकमध्ये भरताना पुरवठा विभाग, टोळी विरोधी पथक व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडला. तांदूळ, ट्रक आणि टेम्पो असा एकूण 23 लाख 94 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले असून तिघांना अटक करण्यात आली आहे.

ताब्यात घेतलेल्या ट्रकसह पोलीस पथक
ताब्यात घेतलेल्या ट्रकसह पोलीस पथक
author img

By

Published : Dec 19, 2019, 7:03 AM IST

यवतमाळ - स्वस्त धान्य दुकानदारांकडे मिळणारा धान्य पुरवठा हा अवैध मार्गाने धामणगांव रोड वरील जैन वे ब्रीज, यवतमाळ येथे टेम्पो मधून ट्रकमध्ये तांदुळ हे भरत असताना पुरवठा विभाग, टोळी विरोधी पथक व स्थानिक गुन्हे शाखा यांनी धाड टाकून माल जप्त केला. याप्रकरणी तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

माहिती देताना पुरवठा अधिकारी

वामन बाबूलाल लांजेवार (वय 40 वर्षे, रा.गोंदिया), वैभव आनंदराव कांबळे (वय 22 वर्षे, रा. रेणूकानगर लोहारा), अजय जैस्वाल (रा.यवतमाळ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत सविस्त वृत्त असे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलन कोयल व टोळी विरोधी पथक, स्थानिक गुन्हे शाखा हे सहकारी वाहनाने गस्त घालत होते. त्यावेळी जैन वे ब्रीज, यवतमाळ-धामणगांव रोडच्या पार्कींगमध्ये मालट्रक (एम एच 35 के 3728) व टेम्पो (एम एच 29 टी 4301) अशी वाहने उभी दिसली. पथकाने पाहणी केली असता टेम्पोतून मालट्रकमध्ये तांदूळ हे टाकत असल्याचे आढळले. पुरवठा निरीक्षक राजेश शिरभाते यांनी जैन वे ब्रीज येथे जावून 2 पंचांसमक्ष सदर वाहने व त्यामध्ये असलेले तांदळांची पाहणी केली. पाहणीवेळी वाहनांमध्ये असेलेले तांदूळ हे अवैधरित्या व स्वस्त धान्य दुकानदारांकडील असून त्याचा पूरवठा हा नागरिकांना होणारा प्रकारामधील असल्याचे आढळले. पुरवठा निरीक्षकांनी 3 लाख 93 हजार रूपये किंमतीचे एकूण 225 पोते (प्रत्येकी 50 किलो) तांदूळ, 15 लाख रूपयांचा ट्रक, 5 लाख रूपये किंमतीचा टेम्पो आणि 750 रिकामे पोती असा एकूण 23 लाख 94 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

हेही वाचा - राज्य सरकार ५० दिवस तरी टिकणार का? रामदास आठवलेंचा उपरोधिक प्रश्न

कारवाई दरम्यान वाहनाचे चालक वामन लांजेवार व वैभव कांबळे यांना सदर मालाचे मालक कोण याबाबत विचारपूस केली असता अजय जैस्वाल (रा.यवतमाळ) यांचे असल्याचे सांगितले. यवतमाळ शहर पोलीस ठाणे येथे पुरवठा निरीक्षक चांदणी शिवरकर यांच्या तक्रारीवरुन जिवनावश्यक वस्तू कायदा कलम नुसार गुन्हा दाखल केला.

हेही वाचा - यवतमाळमधील अपूर्ण प्रकल्प तातडीने पूर्ण करू - मुख्यमंत्री

Intro:Body:यवतमाळ : स्वस्त धान्य दुकानदारांकडील मिळणारा धान्य पुरवठा हा अवैध मार्गाने धामणगांव रोड वरील जैन वे ब्रीज, यवतमाळ येथे पिकअप टेम्पो मधून मालवाहू ट्रकात तांदुळ हे भरत असतांना पुरवठा विभाग व टोळी विरोधी पथक स्थानिक गुन्हे शाखा यांनी धाड टाकून माल जप्त केला. चोरीच्या शासकीय धान्यासह पकडण्यात आलेल्या आरोपींमध्ये वामन बाबूलाल लांजेवार (४०) रा.गोंदिया, वैभव आनंदराव कांबळे (२२) रा. रेणूकानगर लोहारा, अजय जैस्वाल रा.यवतमाळ यांचा समावेश असून या सर्वांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांना मीळालेल्या माहितीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलन कोयल व टोळी विरोधी पथक, स्थानिक गुन्हे शाखा हे सहकारी वाहनाने पेट्रोलींग करीत असतांना त्यांना सूमारास जैन वे ब्रीज, यवतमाळ -धामणगांव रोड चे पार्कींग मध्ये माल ट्रक (एमएच ३५ के ३७२८) व पिकअप ४०७ टेम्पो (एमएच २९ टी ४३०१) असे वाहणे उभी दिसले. पिकअप वाहनातून मालट्रक मध्ये तांदूळ हे क्रॉसींग करत असतांना आढळले. तहसीलदार यांना दिलेले लेखी पत्रावरुन पूरवठा निरीक्षक यांना कारवाईचे आदेश प्राप्त झाले व पूरवठा निरीक्षक राजेश शिरभाते यांनी जैन वे ब्रीज येथे येवून २ पंचासमक्ष सदर वाहणे व त्यामध्ये असलेले तांदूळ यांचे पाहणी केली असता वाहनांमध्ये असेलेले तांदूळ हे अवैधरित्या व स्वस्त धान्य दुकानदारांकडील असून त्याचा पूरवठा हा नागरिकांना होणारा प्रकारामधील असल्याचे आढळल्याने जप्त केले. घटनाठिकाणी जप्त करण्यात आलेला मुद्देमाल एकुण तांदूळ कट्टे २२५, (प्रत्येकी ५० किलो) एकुण ३ लाख ९३ हजार ७५० रुपये, ट्रक १५ लाख रुपयाचा, पिकअप ५ लाख एकुण खाली पोते ७५० असा एकुण २३ लाख ९४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
कारवाई दरम्यान वाहनाचे चालक वामन लांजेवार व वैभव कांबळे यांना सदर मालाचे मालक कोण याबाबत विचारपूस केली असता अजय जैस्वाल रा.यवतमाळ यांचे असल्याचे सांगीतले. यवतमाळ शहर पोलीस स्टेशन येथे पूरवठा निरीक्षक चांदणी शिवरकर यांचे तक्रारी वरुन जिवनावश्यक वस्तू कायदा कलम नुसार गुन्हा दाखल केला.

बाईट - एस. बि. भराडी, जिल्हा पुरवठा अधिकारी

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.