यवतमाळ - वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत झालेल्या एका 27 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह वैद्यकीय महाविद्यालयाला मागील 3 दिवसांपासून सापडत नसल्याने मृताचे नातलग चिंतेत आहेत. मृतदेह सापडत नसल्याने आता नातलगांनी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये बसून उपोषण सुरू केले आहे. रोशन ढोकने असे या मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्याचा मृतदेह तीन दिवसांपूर्वी गायब झाला.
रोशनच्या मृतदेहासाठी नातलगांकडून जिल्हा रुग्णालयातच उपोषण; चौकशी समितीची स्थापना - यवतमाळ वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
मृत झालेल्या एका 27 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह वैद्यकीय महाविद्यालयाला मागील 3 दिवसांपासून सापडत नसल्याने मृताचे नातलग चिंतेत आहेत. मृतदेह सापडत नसल्याने आता नातलगांनी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये बसून उपोषण सुरू केले आहे. रोशन ढोकने असे या मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्याचा मृतदेह तीन दिवसांपूर्वी गायब झाला.
यवतमाळ
यवतमाळ - वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत झालेल्या एका 27 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह वैद्यकीय महाविद्यालयाला मागील 3 दिवसांपासून सापडत नसल्याने मृताचे नातलग चिंतेत आहेत. मृतदेह सापडत नसल्याने आता नातलगांनी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये बसून उपोषण सुरू केले आहे. रोशन ढोकने असे या मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्याचा मृतदेह तीन दिवसांपूर्वी गायब झाला.
त्याचा मृतदेह मृत्यू झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी मिळेल, असे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने नातलगांना सांगितले. मात्र, आता तीन दिवस झाले तरी मृत रोशन ढोकने याचा मृतदेह कुठेच कुणाला सापडत नाही. त्यांच्या नातलगांनी सर्वत्र शोध घेतला शवगृहात शोधले, वार्डमध्ये शोधले जिथं-जिथं तो उपचाराकरिता दाखल होता ते सारे शोधले कुठेच मृत रोशनचा पत्ता लागत नसल्याने नातलग चिंतेत सापडले आहेत. सर्व वार्डमध्ये शोधला तरी कुणालाच त्याचा नेमका मृतदेह कुठं आहे म्हणून रुग्णालयाचे प्रशासन यात काहीच सांगत नाही आणि त्यामुळे नातलगांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली आहे. रोशन हा नेर तालुक्यातील पिंपळगाव काळे गावचा रहिवासी असून घरातील कर्ता तरुण होता तसेच तो अविवाहित होता. त्याला उष्माघाताचा त्रास झाल्याने त्याला प्रथम नेर ग्रामीण रुग्णालयात आणि त्यानंतर यवतमाळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयमध्ये दाखल केले होते.
शहर पोलीस ठाण्यात तक्रार
रोशनचा मृतदेह सापडत नसल्याने नातलगांनी यवतमाळच्या शहर पोलीस ठाण्यामध्ये त्याबद्दल तक्रार दाखल केली आहे. तर यावर पोलीससुध्दा काहीच प्रतिक्रिया देत नाहीत. तर वैद्यकीय महाविद्यालयचे अधीक्षक डॉ. सुरेंद्र भुयार यांना याबद्दल विचारणा केली असता रोशनचा मृतदेह सापडत नसल्याने 4 वेळा शवविच्छेदन कक्षात आणि सर्व हॉस्पिटलमध्ये तेथील वार्ड शोधून झाले तरी मृतदेह काही सापडला नाही. त्यामुळे आता मृतदेह सापडत नसल्याने चौकशी समिती गठीत केली. असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र केमेरा समोर बोलण्यास किंवा प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला. त्यामुळे एकूण संपूर्ण प्रकरण गंभीर असून मृत रोशनच्या मृतदेह कुठं गेला याचा अजूनही थांगपत्ता लागत नसल्याने नातलग मात्र रुग्णालयातच्या रोशनचा मृतदेह शोधण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयमध्ये त्याचा रोज शोध घेत येरझारा मारत आहेत. त्यामुळेच कंटाळून नातलग आता उपोषणाला बसले आहेत.