ETV Bharat / state

बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉ. रामराव महाराज कालवश; सोमवारी होणार अंत्यसंस्कार - रामराव महाराज अंत्यसंस्कार

संत सेवालाल महाराजांचे वंशज आणि बंजारा समाजाचे धर्मगुरू डाॅ. रामराव महाराज यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते 85 वर्षाचे होते. श्वसनाचा त्रास सुरू झाल्याने मागील काही महिन्यांपासून लिलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. रामराव महाराज यांच्या पार्थिवावर वाशिम जिल्ह्यातील पोहरदेवी येथे सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

dr ramrav maharaj
बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉ. रामराव महाराज
author img

By

Published : Oct 31, 2020, 7:52 PM IST

वाशिम - बंजारा समाजाचे धर्मगुरू रामराव महाराज यांचे काल रात्री मुबंई येथील लीलावती रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाने बंजारा समाजात हळहळ व्यक्त होत आहे. पोहरादेवी येथे त्यांच्या पार्थिवावर सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी दिली.

पोहरादेवी येथे बंजारा समाजचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांची समाधी आहे. संत सेवालाल यांचे वंशज असल्याने रामराव महाराज यांच्यावर बंजारा समाजाची अपार श्रध्दा होती. इतरही समाजात त्यांना मान होता. मागील वर्षभरापासून त्यांना प्रकृती साथ देत नसल्याने मुंबई येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. कोजागिरी पौर्णिमेला रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने शोक व्यक्त होत आहे. बंजारा समाजचे धर्मगुरू असल्याने अंत्यसंस्काराला पोहरादेवी येथे भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. येथे कुणीही गर्दी करू नये, असे आवाहन वनमंत्री संजय राठोड यांनी केले आहे.

कोण होते डॉ. रामराव महाराज -
संत सेवालाल महाराजांचे वंशज आणि बंजारा समाजाचे धर्मगुरू डाॅ. रामराव महाराज यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते 85 वर्षाचे होते. श्वसनाचा त्रास सुरू झाल्याने मागील काही महिन्यांपासून लिलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. रामराव महाराज यांच्या पार्थिवावर वाशिम जिल्ह्यातील पोहरदेवी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. बंजारा समाजाचे धर्मगुरू रामरावबापू महाराज यांचा जन्म 7 जुलै 1935 ला पोहरादेवी येथे झाला. 1948 मध्ये पोहरादेवी येथील परशराम महाराजांचे निधन झाल्यावर वयाच्या 14 व्या वर्षी ते गादीवर बसले. परिसरातील 52 गावच्या नाईक यांनी रामरावबापू महाराजांना उत्तराधिकारी म्हणून गादीवर बसविले. 12 वर्षे अनुष्ठान व 12 वर्षे मौन धारण केल्यानंतर बापू यांनी देश भ्रमणास सुरूवात केली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.