ETV Bharat / state

राज्य सरकार ५० दिवस तरी टिकणार का? रामदास आठवलेंचा उपरोधिक प्रश्न - ramdas athavle in yavatmal

सद्या सुरू असलेल्या घडामोडी बघता राज्य सरकार पन्नास दिवस तरी टिकणार का, असा उपरोधिक प्रश्न केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे.

ramdas athavle commented on mahavikas aghadi in yavatmal
रामदास आठवले
author img

By

Published : Dec 16, 2019, 7:54 PM IST

Updated : Dec 16, 2019, 8:01 PM IST

यवतमाळ - सध्या सुरू असलेल्या घडामोडी बघता राज्य सरकार पन्नास दिवस तरी टिकणार का, असा उपरोधिक प्रश्न केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. दौऱ्यादरम्यान त्यांनी शहरातील शासकीय निवासस्थानात पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी भाजप तीन वर्षे आणि शिवसेना दोन वर्षे असा सत्ता स्थापन करण्याचा फार्मूला ठरल्याची माहिती आठवले यांनी दिली. परंतु, तसे न झाल्याने भाजपला सत्ता गमवावी लागली, असे ते म्हणाले.

रामदास आठवले

राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल विधान केले होते. यावरुन हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात गदारोळ पाहायला मिळाला. यावर बोलताना, काँग्रेस आणि सेनेत सावकरांबद्दल कायमच मतभेद असल्याचे त्यांनी सांगितले. सावरकरांचे देशाच्या जडणघडणीत योगदान असून राहुल गांधी यांनी घेतलेली भूमिका न पटणारी असल्याचे ते म्हणाले. तसेच याच मुद्यावर काँग्रेसने सेनेचा पाठिंबा काढला पाहिजे, असे मत आठवले यांनी व्यक्त केले.

पुढे बोलताना, भाजप आणि शिवसेनेने एकत्र यावे, ही रिपाईची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.

Intro:Body:यवतमाळ: महाविकास आघाडीत सेनेचे उध्दव ठाकरे ये मुख्यमंत्री झाले आहे. भाजप तीन वर्षे आणि शिवसेना दोन वर्षे असा सत्ता स्थापन करण्याचा फार्मूला दिला होता. परंतु, तसे झाले नाही. त्यामुळे भाजपला सत्ता गमवावी लागली. सद्या सुरू असलेल्या घडामोडी बघता राज्य सरकार पन्नास दिवस तरी टिकणार काय, असा उपरोधिक सवाल केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला. यवतमाळ येथे त्यांनी रेस्ट हाऊसमध्ये पत्रकारांसोबत संवाद साधला. स्वातंत्रवीर सावरकर यांच्या मुद्यावर काँग्रेस आणि सेनेत मतभेद आहे. सावरकर यांचे देशाच्या जडणघडनित योगदान आहे. खासदार राहुल गांधी यांनी घेतलेली भूमिका नपटणारी आहे. याच मुद्यावर काँग्रेसने सेनेचा पाठिंबा काढला पाहिजे, असे मत केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांनी व्यक्त केले. सत्ता स्थापन करून18 दिवस झाले. अजुनही मंत्रिमंडळ स्थापन झाले नाही. ज्यांनी शपथ घेतली. त्यांचे खाते वाटप उशिरा झाले. भाजप आणि सेना यांनी एकत्र यावे, अशी रिपाईची भूमिका असल्याचे मंत्री आठवले यांनी स्पष्ट केले.Conclusion:
Last Updated : Dec 16, 2019, 8:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.