यवतमाळ- वणीच्या चिखलगाव परिसरात अवैध्यरित्या तुंबाखू आणि सुपारी बनवणाऱ्या कारखान्यावर पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत ५ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात तंबाखू आणि गुटखा बंदी सारख्या नियमांना पायदळी तुडवण्यात येत असल्याचे चित्र दिसत आहे.
दीपक कवडू चावला (रा. महादेव नगर, चिखलगाव, वणी) या व्यक्तीच्या घरी अवैद्यरित्या सुगंधित तुंबाखू आणि सुपारी बनवण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीच्या घरी धाड टाकली असता आरोपीने घराच्या वरच्या मजल्यावर शेड उभारून तिथे प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूचा कारखाना सुरु केल्याचे दिसून आले. एवढेच नाही तर नागपूरमधील दोन नामांकिंत कंपन्यांचा पाकिटात निकृष्ट दर्जाची नकली सुपारी भरली जात होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरिक्षक वैभव जाधव करत आहेत.
![वणीत गुटखा कारखान्यावर धाड; साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-ytl-01-vani-karwai-vis-byte-mh-10049_09012021113442_0901f_1610172282_352.jpg)