ETV Bharat / state

यवतमाळमध्ये वादळी वाऱ्याचा कहर, वीज पडून एकाचा मृत्यू - stormy winds

यवतमाळ जिल्ह्यात गुरुवारी जोरदार वारा आणि पाऊस झाला यामुळे मोठ्या प्रमाणात वित्त आणि जिवित हानी झाली.

वादळी वारे, पाऊस आणि वीज पडून झालेले नुकसान
author img

By

Published : Jun 7, 2019, 8:47 AM IST

यवतमाळ - वादळी वाऱ्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी गुरुवारी कहर केला. यामुळे मोठ्या प्रमाणावर वित्तहाणी झाली. यावेळी करंजखेड येथील आत्माराम मरेजी ठाकरे (६९) यांच्या घरावर वीज कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला. गुरूवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ही घडली.

वादळ आणि ढगांच्या गडगडाटासह आलेल्या पावसाने करंजखेड गावात हैदोस घातला. या नैसर्गिक आपत्तीत ठाकरे यांच्या घरावर वीज कोसळली. यामुळे त्यांचे संपूर्ण घर कोसळले. या दुर्घटनेत ठाकरे गंभीररित्या जखमी झाले होते. त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाला.

करंजखेड गावात दुसऱ्या एका घटनेत घराच्या पत्र्यावर ठेवलेला दगड डोक्यात पडल्याने गजानन किसन राठोड (३५) गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दोन्ही घटनास्थळी तहसीलदार निलेश मडके यांनी भेट दिली असून गावातील नुकसानीचा पंचनामा महसूल प्रशासनाकडून सुरू आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

दारव्हा तालुक्यातील लाखखिंडलाही या वादळाचा मोठा तडाखा बसला आहे. यामुळे गावातील अनेक घरांची पडझड झाली आहे. तसेच काही व्यक्ती किरकोळ जखमी झाल्याचे महसूल प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. दुसरीकडे दुय्यम निबंधक कार्यालय परिसरात आग लागल्याची घटनाही गुरुवारी घडली. मात्र, आगीची माहिती मिळताच नागरिकांनी तात्काळ उमरखेड नगरपालिकेला याबाबत माहिती कळवली. त्यानंतर पालिकेच्या अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेत ही आग आटोक्यात आणली.

Intro:करंजखेड येथे वीज पडून एकाचा मृत्यू
-दारव्हा तालुक्यातील लाखखींड येथे वादळाचा तडाखा
-उमरखेड सबरजिस्टार कार्यालय परिसरात आग Body:यवतमाळ : घरावर वीज कोसळल्याने करंजखेड येथील आत्माराम मरेजी ठाकरे (६९) यांचा मृत्यू झाला. आज गुरूवारी ( दि. ६ जून ) रात्री ९ वाजता ही दुर्घटना घडली. सोसाट्याचे वादळ आणि ढगांच्या गडगडाटासह आलेल्या पावसाने करंजखेड गावात हैदोस घातला. या नैसर्गीक प्रकोपात आत्माराम ठाकरे यांच्या घरावर वीज कोसळली. या वज्राघाताने संपुर्ण घर कोसळले. या दुर्घटनेत आत्माराम ठाकरे गंभीररित्या जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी हलविण्यात आले परंतू त्यांची प्राणज्योत मालवली होती.
याच गावात घरावरील पत्रे स्वरक्षण साठी असलेला दगड डोक्यावर पडल्याने गजानन किसन राठोड (३५) गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता भरती करण्यात आले. या दोन्ही
घटनास्थळी तहसीलदार घटना नीलेश मडके यांनी भेट दिली असून गावातील नुकसानीचे पंचनामा महसूल प्रशासनाकडून सुरू आहे.

तसेच दारव्हा तालुक्यातील लाखखींड येथे वादळाचा मोठा तडाखा बसला आहे. या गावातील अनेक घरांची पडझड झाली आहे. काही व्यक्ती किरकोळ जखमी झाल्याचे महसूल प्रशासनाने सांगितले.

त्याचबरोबर उमरखेड सबरजिस्टार कार्यालय परिसरात आग लागल्याची घटना घडली. या जुन्या इमारतीच्या परिसरात झाडे कचरा होता. या ठिकाणी आग लागली होती.
नागरिकांच्या ही बाब लक्षात येताच
लगेच उमरखेड नगरपालिकेच्या अग्निशमन बंबाने ही आग आटोक्यात आणण्यात आली. पालिकेच्या अग्निशमन विभागाने केलेल्या तात्काळ कारवाईमुले मोठा अनर्थ टळला. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.