यवतमाळ - काँग्रेसवाले भुरटे चोर तर भाजपवाले संघटित दरोडेखोर असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. भाजपने काँग्रेस राष्ट्रवादीची जी अवस्था केली आहे. भविष्यात तीच गत सत्ता गेल्यावर भाजपची होईल. अशी भविष्यवाणी आंबेडकर यांनी केली आहे. यवतमाळच्या वणी येथे डॉ. महेंद्र लोढा यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत आंबेडकर बोलत होते.
हेही वाचा - मदत न करणाऱ्या सरकारला सत्ता द्यायचीच कशाला? - आंबेडकर
यावेळी त्यांनी काँग्रेस आणि भाजप वर टीकास्त्र सोडले. काँग्रेसवाले भुरटे चोर तर भाजपवाले संघटित दरोडेखोर निघाले आहे. त्यामुळे यावेळी वंचित बहुजन आघाडीला संधी देण्याचे आवाहन आंबेडकर यांनी केले. सत्ताधारी हे पुजाऱ्यासारखे सारखे आहेत. पुजाऱ्याची नजर ज्यावर असते तशी सरकारची नजर तिजोरीवर असून बँका बुडीत काढून सर्वसामान्यांची त्यांनी लूट केली. असा घणाघात प्रकाश आंबेडकर यांनी केला.
हेही वाचा - राष्ट्रीय पक्षांकडून न्याय मिळाला नाही- बाबासाहेब गाडे पाटील