यवतमाळ : शहरामध्ये मागील दहा दिवसापासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. २२ फेब्रुवारीपासून तर ३ मार्च या कालावधीत २२५९ रुग्ण पॉझिटिव्ह निघाले आहे. तर याच दहा दिवसात २२ नागरिकांचा कोरोनाने बळी घेतला. यासाठी नागरिकांचा निष्काळजीपणा कारणीभूत ठरत आहे. म्हणूनच ४ मार्च रोजी सायंकाळी पाच वाजल्यापासून यवतमाळ शहरात आठवडाभरासाठी संपूर्ण कडक संचारबंदी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहेत.
यवतमाळमध्ये लागू होणार कडक संचारबंदी? - Increase in corona patients in yavatmal
यवतमाळ शहरामध्ये दररोज ३००० नागरिकांच्या तपासण्या करण्यात येत आहे. यातील संशयित रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येत आहे. मात्र, हे नागरिक कुठल्याही जबाबदारीचे भान न ठेवता इतरांच्या संपर्कात येत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे.
यवतमाळमध्ये पूर्ण लॉकडाऊन लागण्याची शक्यता
यवतमाळ : शहरामध्ये मागील दहा दिवसापासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. २२ फेब्रुवारीपासून तर ३ मार्च या कालावधीत २२५९ रुग्ण पॉझिटिव्ह निघाले आहे. तर याच दहा दिवसात २२ नागरिकांचा कोरोनाने बळी घेतला. यासाठी नागरिकांचा निष्काळजीपणा कारणीभूत ठरत आहे. म्हणूनच ४ मार्च रोजी सायंकाळी पाच वाजल्यापासून यवतमाळ शहरात आठवडाभरासाठी संपूर्ण कडक संचारबंदी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहेत.
Last Updated : Mar 3, 2021, 7:29 PM IST