यवतमाळ - ग्रामीण पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या पिंपरी जंगलातील जुगार अड्ड्यावर धाड टाकून सहा जुगाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. यावेळी 11 दुचाकींसह पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सात जुगारी फरार झाले असून, त्यांचा शोध पोलीस घेत आहे. यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली.
11 दुचाकींसह पाच लाखांचा मुद्देमाल जप्त
अंकुश कांबडी (23 रा. घुईखेड, जि. अमरावती), मंगेश सखाराम गावंडे (27), रजनिकांत दिलीप खाडे (3, दोघेही रा. बोथ, ता. दारव्हा), नौशाद शेख निजाम शेख (18, रा. हनुमाननगर, नेर), नितीन शंकर खडसे (26 रा. अण्णाभाऊ साठे चौक, नेर), मोहसिन खान, नजीर खान (27, रा. वाणीपूरा, नेर) अशी अटकेतील जुगारींची नावे आहे.
यवतमाळ ग्रामीणचे ठाणेदार गजानन करेवाड यांना पिंपरी जंगल शिवारात जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. पोलिसांनी धाड टाकली असता, जुगारी मिळून आले. अंगझडतीत 17 हजार 340 रुपये व 4 लाख 55 हजारांच्या 11 दुचाकी जप्त केल्या. एकुण 13 जणांविरुद्घ जुगार कायद्या अंतर्गत ग्रामीण पोलिसांनी गुन्हे दाखल केले.
हेही वाचा - विशेष: ह्रदयद्रावक ठरलेल्या रुग्णालयातील आगीच्या काही दुर्घटना