ETV Bharat / state

जगावं तरी कसं ? कोरोनामुळे पपई उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात - कोरोना विषाणू

काही दिवसांपूर्वी राळेगाव परिसरात अवकाळी पावसासह गारपीट झाली होती. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या संकटातून शेतकरी कसाबसा सावरत नाही तोच कोरोनाचे संकट येऊन ठेपले आहे.

Yavatmal
कोरोनामुळे पपई उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात
author img

By

Published : May 6, 2020, 12:31 PM IST

यवतमाळ - जिल्ह्यातील पपई उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. कोरोनाच्या संकटांमुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला उठाव नाही. त्यामुळे आता जगावं तरी कसं? असा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे.

राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथील हरीश काळे अशाच शेतकऱ्यांपैकी एक आहेत. हरीश यांच्याकडे 8 एकर शेती आहे. शेतात सिंचनाची सोय आहे. यावेळी हरीश यांनी 8 एकर पैकी 5 एकरात पपईची लागवड केली आहे. पपई लागवडीसाठी त्यांना सुमारे 7 ते 8 लाख रुपये खर्च आला आहे. मात्र, कोरोनामुळे त्यांच्या पपईला खरेदीदार मिळाला नसल्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

कोरोनामुळे पपई उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात

दरम्यान, काही दिवसांपूर्वी राळेगाव परिसरात अवकाळी पावसासह गारपीट झाली होती. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या संकटातून शेतकरी कसाबसा सावरत नाही तोच कोरोनाचे संकट येऊन ठेपले आहे. झाडावर पपई बहरली असून पदरी दोन पैसे येतील, अशी आशा शेतकऱ्यांना होती. पण, कोरोना संकटामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाल्याने पपईला कोणी खरेदीदाराच मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.