यवतमाळ - झारीजामनी तालुक्यात एक दुचाकीस्वाराचा पुरात वाहून मृत्यू झाल्याची घटना घडली. शुद्धोधन रंगारी असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
![नाल्याला अचानक आलेल्या पुरात दुचाकीस्वारचा मृत्यू झाला](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/4414884_flood-image.jpg)
झारीजामनी तालुक्यात काल (बुधवार) सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. यामुळे झारी ते घोंसा-वणी मार्गावरील नाल्याला अचानक पूर आला. मित्रासह दुचाकीने जाणाऱ्या शुद्धोधन यांना पाण्याचा अंदाज आला नाही. ते दुचाकीसह वाहून गेले. मात्र, त्यांचा मित्र अनिल लेनगुरे हा पाण्यातून बाहेर पडण्यात यशस्वी झाला.
हेही वाचा - गणेश विसर्जन करण्यासाठी गेलेल्या काका-पुतण्याचा नदीत बुडून मृत्यू
शुद्धोधन यांचा मृतदेह आज घटनास्थळापासून अर्धा किलोमीटर अंतरावर झाडाला अडकलेल्या अवस्थेत आढळला. मृत शुद्धोधन हे गवंडी काम करत होते. कामावरून मित्रासह आपल्या पवणार गावाकडे जाताना ही दुर्घटना घडली. गावातील नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी शोध घेतला असता, पुलाखालील झाडाला त्यांचा मृतदेह सापडला. पोलिसांनी शुद्धोधन रंगारी यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला.