ETV Bharat / state

टेम्पो-दुचाकीच्या अपघातात एक जण ठार - यवतमाळ जिल्हा लेटेस्ट न्यूज

वणी - मुकुटबन मार्गावरील 18 नंबर पुलाजवळ एका भरधाव हायवा टेम्पोने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. विजय चंदनखेडे (रा.पांढरकवडा) असे या मृत दुचाकीस्वाराचे नावा आहे.

टेम्पो-दुचाकीच्या अपघातात एक जण ठार
टेम्पो-दुचाकीच्या अपघातात एक जण ठार
author img

By

Published : May 8, 2021, 9:32 PM IST

यवतमाळ - वणी - मुकुटबन मार्गावरील 18 नंबर पुलाजवळ एका भरधाव हायवा टेम्पोने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. विजय चंदनखेडे (रा.पांढरकवडा) असे या मृत दुचाकीस्वाराचे नावा आहे.

टेम्पो-दुचाकीच्या अपघातात एक जण ठार

हा टेम्पो (एमएच-४० बीजी ६५५१) कायरकडून वणीकडे येत होता. तर दुचाकीस्वार (एमएच 29 बिके 4237) वणीकडून कायरकडे जात होता. याचदरम्यान मुकुटबन मार्गावरील 18 नंबरच्या पुलाजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. या अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान दुचाकीस्वाराजवळ एक ओळखपत्र आढळून आले आहे. यात विजय चंदनखेडे असे नाव असून, तो जिल्ह्यातील पांढरकवडा येथील रहिवासी आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले, या अपघातानंतर हायवा चालक फरार झाला असून, त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा - सख्ख्या बहिणीचे नवऱ्यासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय, महिलेने केला तीन वर्षीय भाच्याचा खून

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.