यवतमाळ - राळेगाव-कळंब रोडवरील राजूर फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला आहे. अपघातावेळी रस्त्यावर इतर कोणताही व्यक्ती नसल्याने अज्ञात वाहनचालक पसार होण्यास यशस्वी झाला. खुशाल नारनवरे (रा. गोंडपुरा, राळेगाव) असे या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
खुशाल नारनवरे हे राळेगावमध्ये ट्रॅक्टर वाहनचालक म्हणून काम करत होते. ते यवतमाळ येथे ट्रॅक्टर दुरुस्तीसाठी आले होते. तेथील काम आटोपून गावाकडे परत येत असताना नारनवरे हे राजूर फाट्याजवळ थांबले होते. त्यावेळी अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. यामध्ये नारनवरे यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पुढील तपास कळंब पोलीस करत आहेत.