ETV Bharat / state

यवतमाळमध्ये कोरोनाचे 17 रुग्ण आढळले; 13 जण एकाच कुटुंबातील - yavatmal corona update

पॉझिटिव्ह असलेल्या एका रुग्णाचा काल रात्री मृत्यू झाल्याने जिल्ह्यात कोरोनाबाधित मृतांची संख्या 3 वर पोहचली आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 145 वर गेला असून, यापैकी 106 जण उपचारानंतर बरे होऊन घरी गेले.

COVID 19 patient
यवतमाळमध्ये कोरोनाचा एक रुग्ण आढळला;एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 20 वर
author img

By

Published : Jun 2, 2020, 9:31 AM IST

Updated : Jun 2, 2020, 2:00 PM IST

यवतमाळ - संस्थात्मक विलागिकरण कक्षात भरती असलेल्या 17 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. या 17 पैकी 13 जण एकाच कुटुंबातील सदस्य आहेत. त्यामुळे जिल्ह्यात अ‌ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या एकूण 36 झाली आहे. पॉझिटिव्ह असलेल्या एका रुग्णाचा काल रात्री मृत्यू झाल्याने जिल्ह्यात कोरोनाबाधित मृतांची संख्या 3 वर पोहचली आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 145 वर गेला असून, यापैकी 106 जण उपचारानंतर बरे होऊन घरी गेले.

वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात एकूण 24 जण भरती आहेत. यात चार प्रिझमटिव्ह केसेस असल्याचे वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने कळविले आहे. शासकीय रुग्णालयाने सोमवारी (दि. 1 जून) 83 नमुने तपासणीसाठी पाठविले. सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण 2 हजार 150 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.

तपासणीसाठी पाठवलेल्या नमुन्यांपैकी 2 हजार 70 अहवाल प्राप्त झाले. यापैकी 106 पॉझिटिव्ह रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच आतापर्यंत 1 हजार 942 अहवाल निगेटिव्ह आले आहे. संस्थात्मक विलगीकरणात 12 तर गृह विलगीकरणात 441 जण आहेत.

यवतमाळ जिल्ह्यात आता रात्री 9 ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या कालावधीत कोणीही विनाकारण बाहेर फिरू नये. या वेळेत विनाकारण फिरताना आढळल्यास कलम 144 अन्वये कारवाई करण्यात येईल. तसेच घराच्या बाहेर पडतांना मास्कचा वापर व सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करावे. दुकानात एकाच वेळी पाचपेक्षा जास्त व्यक्ती राहणार नाही, याची खबरदारी घ्यावी. जर दुकानात एकाचवेळी पाचहून अधिक जण आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच घरातील 60 वर्षांवरील व्यक्ती आणि 10 वर्षांखालील मुलांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी केले आहे.

हेही वाचा - जिल्ह्यात 30 जूनपर्यंत 'लॉकडाऊन', प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी

Last Updated : Jun 2, 2020, 2:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.