ETV Bharat / state

धक्कादायक...! डबक्यात पडून दीड वर्षीय चिमुकलीचा मृत्यू - newborn baby died into pits

घाटंजी तालुक्यातील खापरी गावातील जोगीनगर येथे ग्रामपंचायतीच्या पाण्याची पाईप लाईन फुटली आहे. यामुळे ग्रामपंचायतीने राजू पवार याच्यां घरासमोर एक महिन्याआधी तीन फुट खड्डा खोदून ठेवला होता.

One and a half year old girl died after falling into a pits in yawatmal
धक्कादायक...! डबक्यात पडून दीड वर्षीय चिमुकलीचा मृत्यू
author img

By

Published : Jun 28, 2020, 2:12 AM IST

Updated : Jun 28, 2020, 6:23 AM IST

यवतमाळ - ग्रामपंचायतने खोदलेल्या खड्ड्यात पडून दीड वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना घाटंजी तालुक्यातील खापरी येथे घडली. खापरी ग्रामपंचायतच्या भोंगळ कारभारामुळे ही घटना घडली, असा आरोप मृत चिमुकलीच्या काकाने केला आहे.

धक्कादायक...! डबक्यात पडून दीड वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

घाटंजी तालुक्यातील खापरी गावातील जोगीनगर येथे ग्रामपंचायतीच्या पाण्याची पाईप लाईन फुटली आहे. यामुळे ग्रामपंचायतीने राजू पवार याच्यां घरासमोर एक महिन्याआधी तीन फुट खड्डा खोदून ठेवला होता. तो न बुजविता तसाच ऊघडा ठेवल्यामुळे राजू पवार यांची साडे सतरा महिन्याची चिमुकली खेळताना खड्यात पडून मरण पावली. त्यामुळे खापरी ग्राम पंचायतवर गुन्हा नोंदवण्यात यावा, अशी मागणी मृत चिमुकलीच्या नातेवाईकांनी केली आहे.

हेही वाचा - ढगफुटी सदृश्य पावसाचा फटका; रिसोड तालुक्यात 400 हेक्टर शेतीचे नुकसान

याबाबत आधीच व्यक्त केली होती भीती -

या खड्ड्यामुळे जीवितहानी होण्याची भीती मुलीच्या नातेवाईकांनी व्यक्त केली होती. तसेच ग्रामपंचायतीकडे वारंवार खड्डा बुजविण्यास सांगितले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून उलट त्यांनाच जीवे मारण्याची धमकी दिली होती, असा आरोपही करण्यात येत आहे. या घटनेचा पुढील तपास घाटंजी पोलीस करीत आहे.

Last Updated : Jun 28, 2020, 6:23 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.