ETV Bharat / state

MP Bhavana Gawali : खासदार गवळींना पक्ष प्रतोद पदावरून हटवल्याने नाराजी; पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश करून समर्थन पत्र लिहून दिले - आमदार संजय राठोड

दिग्रस मतदार संघाचे ( Digras constituency )आमदार संजय राठोड यांनी शनिवारी शिंदे गटाचे गटनिरीक्षक राजेंद्र फाटक यांच्या उपस्थितीत पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून समर्थन पत्र लिहून घेण्यात आले होते. मात्र खासदार भावना गवळी यांचे शिंदे गटात सामील झाल्याचे अध्यापही स्पष्ट नव्हते. मात्र आता रविवारी यवतमाळच्या विश्रामभवनात ( Yavatmal Vishrambhava ) पदाधिकारी कार्यकर्ते एकत्रित येत शिंदे गटाला समर्थन पत्र लिहून देत जाहीर केल्याचे दिसून येत आहे.

Bhavna Gawlina
भावना गवळी
author img

By

Published : Jul 17, 2022, 4:56 PM IST

यवतमाळ : . यवतमाळ जिल्ह्यात शिवसेना आमदार संजय राठोड ( Sanjay Rathore ) यांच्यासोबतच खासदार भावना गवळी ( Bhavana Gawali ) यांचा गट देखील शिंदे गटात सामील झाला आहे. गवळींना पक्ष प्रतोद पदावरून हटविल्याने नाराजी व्यक्त करीत त्यांचे समर्थक शिवसेना पदाधिकारी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांच्या गटात दाखल झाले. यामध्ये पुसद, यवतमाळ, बाभूळगाव या तालुक्यातील शिवसैनिकांचा समावेश आहे.

प्रतिक्रिया देताना कार्यकर्ते

यवतमाळ जिल्ह्यात शिवसेनेमध्ये आमदार संजय राठोड व खासदार भावना गवळी यांचे दोन गट आहेत. या दोन्ही नेत्यांमधील वैर सर्वश्रुत आहेत. ईडी ची चौकशी लागल्यापासून खासदार गवळी या वर्षभरापासून मतदारसंघात फिरकल्या नाही. अशात त्यांनी देखील शिंदे गटात सामील होण्याची भूमिका घेतल्याने राठोड व गवळी या नेत्यांमध्ये मनोमिलन होणार का? याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तर दुसरीकडे शिवसेनेने दोन्ही नेत्यांच्या समर्थक पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करून नव्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.

या पुर्वी जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर - यवतमाळ जिल्ह्यातील पदाधिकारी ( Yavatmal District Officer ) आणि कार्यकर्त्यांसोबत उद्धव ठाकरे यांची बैठक ( Uddhav Thackeray meeting with workers ) पार पडली. याप्रसंगी जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर ( Appointments of Shiv Sena office bearers announced ) करण्यात आल्याची माहिती प्रसिद्ध पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. शिवसेनेचे आमदार संजय राठोड व खासदार भावना गवळी यांना धक्का बसला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Party leader Uddhav Thackeray ) यांच्या आदेशाने यवतमाळ जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर ( Appointments of Shiv Sena officials announced ) करण्यात आल्या आहेत. अशी माहिती मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. संजय राठोडच्या मतदारसंघातील ( Sanjay Rathore Constituency ) दारव्हा, दिग्रस ,नेर ,मधील शिवसेना पदाधिकारींच्या नव्याने केल्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

शिवसेना मध्यवर्ती कार्यालयालातून नियुक्त्या जाहीर - संजय राठोड भावना गवळी समर्थकांच्या जागी नव्याने नियुक्त्या करण्यात आले आहे. तर जिल्हा सहसंपर्क प्रमुख पदी माजी आमदार बाळासाहेब मुनगिनवार , दारव्हा तालुका प्रमुखपदी अजय गाडगे , नेर तालुका प्रमुखपदी नितीन माकोडे, दिग्रस तालुका प्रमुखपदी यादव पवार यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे. तर यवतमाळ शहर प्रमुख नगरसेवक पिंटू बांगर यांच्या जागी निलेश बेलोकार ,योगेश भांदककर यांची नियुक्ती तर आर्णी तालुका प्रमुखपदी मनोज ढगले, पांढरकवडा तालुका प्रमुखपदी तिरुपती करकुंदिवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा : Yavatmal Shivena party Changes : संजय राठोड आणि भावना गवळी यांना धक्का, उद्धव ठाकरेंकडून यवतमाळमध्ये नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.