यवतमाळ - परिचारीका कर्तव्यांबाबत शब्दांचा गैरवापर केल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशनच्या नेतृत्वात कामबंद आंदोलन करत डॉक्टरांनी माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली.
सकाळी साडेदहा वाजेदरम्यान बालरोग विभागप्रमुख डॉ. अजय केशवानी वॉर्ड क्र. 9 मध्ये राऊंडसाठी आले. रुग्ण, नातेवाईक व डॉक्टरांसमोर परिचारिकांना नर्सिंग प्रोफेशन हे एरर आहे. त्यामुळे रुग्ण दगावतात, अशा शब्दांचा गैरवापर केला. एकीकडे अधिपरिचारिकेला नर्सिंग ऑफिसर हे पदनाम दिले जाते. दुसरीकडे डॉक्टर नर्सिंग व्यवसायाबद्दल शब्दाचा गैरवापर करत असल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. डॉ. केशवाणी यांनी परिचारिकांचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला. डॉक्टरांनी माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली होती. परंतु, त्यांनी टोलवाटोलवी केली. शनिवारी सकाळपासून डीन यांच्या कक्षाबाहेर नर्सेसने कामबंद आंदोलन पुकारले आहे. यात अध्यक्ष शोभा खडसे, छाया मोरे, माया मोरे, तुषार घायवान, नंदा साबळे, शशिकांत चारबे, पूनम ढोके यांच्यासह नर्सेस सहभागी झाल्या होत्या.
हेही वाचा - तीन हेक्टरमधील उसाला आग; शेतकऱ्याचे पंधरा लाखाचे नुकसान