ETV Bharat / state

'मंत्रिपदाबाबत कोणताही तिढा नाही; मुख्यमंत्री तीनही पक्षाला न्याय देतील' - Minister portfolio

राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाली असून मंत्रिपदाबाबत कोणताही तिढा नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तीनही पक्षाला न्याय देतील, असे माणिकराव ठाकरे यांनी म्हटले आहे.

manikrao thackeray
माणिकराव ठाकरे
author img

By

Published : Jan 4, 2020, 11:14 PM IST

यवतमाळ - राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. मंत्रिमंडळाचा विस्तारही झाला. मात्र, अद्याप खातेपाटप झालेले नाही. याबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांना विचारले असता, त्यांनी मंत्रिपदाबाबत कोणताही तिढा नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तीनही पक्षाला न्याय देतील, असे म्हटले आहे.

माणिकराव ठाकरे यांची प्रतिक्रिया...

हेही वाचा... 'ज्यांच्या बापजाद्यांनी ब्रिटिशांचे पाय चाटले ते आमच्याकडे नागरिकत्वाचा पुरावा मागतायेत'

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्रिमंडळातील मंत्री निश्चित झाले. परंतू अद्याप काँग्रेसने आपली यादी जाहीर केलेली नाही. काँग्रेसला ग्रामीण भागाशी निगडित ग्रामविकास आणि कृषी खाते हवे, यासाठी काँग्रेस आग्रही असल्याचे बोलले जात आहे. या संदर्भात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी तीन पक्षांचे सरकार असून सर्वांना समान न्याय मिळेल, अशी आमची अपेक्षा असल्याचे म्हटले आहे. तसेच खाते वाटपात कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत. काँग्रेस पक्षाकडून कोणत्याही खात्याबाबत आग्रह धरला गेलेला नाही. या सर्व बाबींवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर मंत्री मिळून योग्य निर्णय घेतील, असे बोलत माणिकराव ठाकरे यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा... 'ओवेसीला उलटं लटकवून दाढी कापेन'

विधान परिषद सदस्य तानाजी सावंत विधानसभा निवडणुकीत विजयी झाले. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ही जागा सेनेच्या कोट्यातील आहे. या जागेवर त्यांचाच अधिकार असेल, अशी स्पष्ट भूमिका ठाकरे यांनी व्यक्त केली. त्यामुळे शिवसेनेने विधानपरिषद निवडणुकीत उमेदवार दिल्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्यांना पुरेपुर मदत करणार. अथवा त्यांच्याकडे सक्षम उमेदवार नसेल आणि आम्हाला विचारणा केली, तर आम्ही सर्व मिळून उमेदवार निश्चित करू, असेही ठाकरे यावेळी म्हणाले.

हेही वाचा... शिवसेनेला मोठा धक्का, अब्दुल सत्तार यांचा राज्यमंत्रिपदाचा राजीनामा

Intro:Body:यवतमाळ : राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाली असून मंत्रीपदाबाबत कुठलाही तिढा नाही.
मुख्यमंत्री तिन्ही पक्षाला न्याय देतील असे काँग्रेसचे जेष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी बोलताना सांगितले.
शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाविकास विकास आघाडी होऊ राज्यात सत्ता स्थापन झाली. मात्र, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्रमंडळातील मंत्री निश्चित झाले. परंतू काँग्रेस ने अध्यप ही आपले यादी जाहीर केली नाही. ग्रामीण भागाशी निगडित ग्रामविकास आणि कृषी खाते यासाठी काँग्रेस आग्रही असल्याचे बोलल्या जात आहे.
या संदर्भात काँग्रेसचे जेष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी तीन पक्षचे सरकार असून समान न्याय मिळेल अशी आमची अपेक्षा आहे. असे माणिकराव ठाकरे यांनी सांगितले.
खाते वाटपात कोणत्याही प्रकारचे मतभेद नाही. काँग्रेस पक्षाकडून कोणत्याही खात्याबाबत आग्रह धरला गेला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री मिळून योग्य निर्णय घेतील, असे सांगून ठाकरे यांनी वादावर पडदा टाकला.

विधान परिषद सदस्य तानाजी सावंत विधानसभा निवडणुकीत विजयी झाले. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ही जागा सेनेच्या कोट्यातील असून, त्यांचाच क्लेम चालेल, अशी स्पष्ट भूमिका काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केली.
शिवसेनेने विधानपरिषद निवडणुकीत उमेदवार दिल्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्यांना पुरेपुर मदत करणार. आम्हाला उमेदवार मागितल्यास सर्व मिळून उमेदवार निश्चित करण्यात येईल, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.

बाईट-माणिकराव ठाकरे, काँग्रेस नेतेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.