ETV Bharat / state

विधानसभेपूर्वी यवतमाळ भाजपमध्ये बदल; नितीन भुतडा नवे जिल्ह्याध्यक्ष

विधानसभा निवडणुकांची घोषणा अवघ्या महिनाभरावर आलेली असताना प्रदेश भाजपने यवतमाळ जिल्ह्यात नेतृत्व बदलाचा  निर्णय घेतला आहे. जिल्हाभाजपच्या अध्यक्षपदी उमरखेड येथील स्वीकृत नगरसेवक नितीन भुतडा यांची नियुक्ती करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही नियुक्ती केली.

author img

By

Published : Aug 20, 2019, 11:46 AM IST

विधानसभेपूर्वी यवतमाळ भाजपमध्ये बदल; नितीन भुतडा नवे जिल्ह्याध्यक्ष

यवतमाळ - विधानसभा निवडणुकांची घोषणा अवघ्या महिनाभरावर आलेली असताना प्रदेश भाजपने यवतमाळ जिल्ह्यात नेतृत्व बदलाचा निर्णय घेतला आहे. जिल्हाभाजपच्या अध्यक्षपदी उमरखेड येथील स्वीकृत नगरसेवक नितीन भुतडा यांची नियुक्ती करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही नियुक्ती केली. आतापर्यंत जिल्हा भाजपचे अध्यक्षपद बहुतांश यवतमाळ जिल्हा मुख्यालयच राहिले आहे. अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच उमरखेडसारख्या मराठवाड्याच्या सीमावर्ती तालुक्याला जिल्हाध्यक्ष पद दिले आहे.

याअगोदर जिल्हाध्यक्षपद राजेंद्र डांगे यांच्याकडे होते. त्यांना दोन वेळा मुदतवाढही देण्यात आली होती. विधानसभेच्या आगामी निवडणुकासुद्धा जिल्ह्यात डांगे यांच्याच नेतृत्वात लढल्या जातील असे मानले जात होते. मात्र, अचानक नव्या जिल्हाध्यक्षांची नियुक्ती झाल्याने भाजपच्या गोटात खळबळ निर्माण झाली. २०१४ च्या निवडणुका मोदी लाटेत भाजपने जिंकल्या. काँग्रेसकडे असलेल्या विधानसभेच्या वणी, आर्णी, राळेगाव, यवतमाळ व उमरखेड या पाचही जागा भाजपने जिंकल्या होत्या. जिल्हाध्यक्ष म्हणून त्याचे श्रेय डांगे यांना दिले जात होते. मात्र, वणी व आर्णी विधानसभा मतदारसंघात पक्ष लोकसभेत घसरल्याचा फटका तर डांगे यांना बसला नाही ना? अशी शंका राजकीय गोटात व्यक्त केली जात आहे. राजेंद्र डांगे यांना अचानक जिल्हाध्यक्ष पदावरून हटवण्याचे नेमके कारण काय याबाबतही तर्कवितर्क लावले जात आहे.

Intro:Body:यवतमाळ : विधानसभा निवडणुकांची घोषणा अवघ्या महिनाभरावर आलेली असताना प्रदेश भाजपने यवतमाळ जिल्ह्यात नेतृत्व बदलाचा धाडसी निर्णय घेतला. जिल्हा भाजपच्या अध्यक्षपदी उमरखेड येथील स्वीकृत नगरसेवक नितीन भुतडा यांची नियुक्ती करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही नियुक्ती केली. आतापर्यंत जिल्हा भाजपचे अध्यक्षपद बहुतांश यवतमाळ जिल्हा मुख्यालयीच राहिले आहे. अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच उमरखेड सारख्या मराठवाड्याच्या सीमावर्ती तालुक्याला जिल्हाध्यक्ष पदाचा मान दिला गेला आहे.
जिल्हाध्यक्षपद राजेंद्र डांगे यांच्याकडे होते. त्यांना दोन वेळा मुदतवाढही देण्यात आली होती. विधानसभेच्या आगामी निवडणुकासुद्धा जिल्ह्यात डांगे यांच्याच नेतृत्वात लढल्या जातील असे मानले जात असतानाच अचानक नव्या जिल्हाध्यक्षाची नियुक्ती झाल्याने भाजपच्या गोटात खळबळ निर्माण झाली. २०१४ च्या निवडणुका मोदी लाटेत भाजपने जिंकल्या. काँग्रेसकडे असलेल्या विधानसभेच्या वणी, आर्णी, राळेगाव, यवतमाळ व उमरखेड या पाचही जागा भाजपने आपल्याकडे खेचून घेतल्या. जिल्हाध्यक्ष म्हणून त्याचे श्रेय डांगे यांना दिले जात होते. माञ, वणी व आर्णी विधानसभा मतदारसंघात पक्ष लोकसभेत माघारल्याचा फटका तर डांगे यांना बसला नाही ना अशी शंका राजकीय गोटात व्यक्त केली जात आहे. राजेंद्र डांगे यांना अचानक जिल्हाध्यक्ष पदावरून हटविण्याचे नेमके कारण काय याबाबतही तर्कवितर्क लावले जात आहेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.