ETV Bharat / technology

तुमचा फोन चोरीला गेल्यास आपोआप होणार लॉक, जाणून घ्या Google चं नविन फीचर्स - Theft Detection Lock

तुमचा फोन हरवल्यास तो पुन्हा सापडू शकतो. गुगलचं Find My Device हे ॲप तुम्हाला फोन शोधण्यात मदत करणार आहे.

author img

By ETV Bharat Tech Team

Published : 2 hours ago

Google
Google चं नविन फीचर्स (Etv Bharat MH Desk)

हैदराबाद Google Find My Device : फोन चोरीला गेल्यास, वैयक्तिक डेटा चोरीला जाण्याचा धोका असतो. आपल्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी फोनमध्ये असतात. त्यामुळं आपल्या माहितीची चोरी होण्याची शक्यता जास्त असते. फोन चोरीला गेल्यास या प्रकारचा धोका वाढू शकतो. हे टाळण्यासाठी गुगलनं चोरी संरक्षण अंतर्गत तीन नवीन सुरक्षा फीचर्स जारी केली आहेत. ही वैशिष्ट्ये Android 10 आणि नंतरच्या आवृत्त्यांसह Android फोनवर काम करणार आहे.

थेफ्ट प्रोटेक्शन : गुगलनं हे फीचर्स आणण्यास सुरुवात केली आहे. कंपनी प्ले सर्व्हिसच्या माध्यमातून या गोष्टी समोर आणत आहे. जर तुम्हाला हे फीचर्स वापरायचं असेल तर सेटिंगमध्ये जाऊन थेफ्ट प्रोटेक्शन सर्च करा. याशिवाय तुम्ही गुगल सर्व्हिस पेजवर जाऊनही या फीचर्सचा वापर करू शकता. या वैशिष्ट्यांची घोषणा या वर्षी मे मध्ये Google I/O 2024 इव्हेंट दरम्यान करण्यात आली होती.

नवीन स्मार्ट वैशिष्ट्य : थेफ्ट डिटेक्शन लॉक फीचर फोनवर सेन्सर्स, वाय-फाय आणि स्मार्ट डिव्हाइस कनेक्शन वापरून कार्य करतं. फोन कोणीतरी चोरला आहे का? ते शोधून ते अनलॉक करतं. ज्यामुळं कोणीही तुमचा वैयक्तिक डेटा पाहू शकत नाही.

ऑफलाइन डिव्हाइस लॉक : ऑफलाइन वैशिष्ट्य तुमचा फोन चोरीला गेल्यावर आणि इंटरनेट बंद असताना हे फिचर काम करतं. गुगलनं हे फीचर वापरण्यासाठी दोन अटी ठेवल्या आहेत. प्रथम, फोन लॉक नसताना, फोन भरपूर वापरला पाहिजे. दुसरे म्हणजे, स्क्रीन दिवसातून फक्त दोनदा लॉक केली जाऊ शकते. जर इंटरनेट नसेल, तर हे फंक्शन फोनचा गैरवापर टाळू शकतं.

रिमोट लॉक : फोन चोरीला गेल्यास रिमोट लॉक वैशिष्ट्य लोकांना android.com/lock लिंकवर प्रवेश करू देतं. यासाठी सेटअप दरम्यान फोन नंबर द्यावा लागेल. तुम्ही फोन नंबर आणि सिक्युरिटी चॅलेंजसह हे फीचर वापरण्यास सक्षम असाल. या फीचरसह चोरीला गेलेला फोन तुम्ही विश्वासू व्यक्तीच्या फोनद्वारे लॉक करू शकता.

गुगलनं ब्राझीलमध्ये या वैशिष्ट्यांची चाचणी सुरू केली. आता जगभरातील पिक्सेल आणि सॅमसंग इत्यादींचे अँड्रॉइड वापरकर्ते या सुविधांचा लाभ घेऊ शकतात. जर तुमच्या फोनमध्ये हे फीचर उपलब्ध नसेल, तर थोडा वेळ तुम्हाला थांबाव लागेल, कारण हे फीचर्स पूर्णपणे लॉन्च झालेलं नाही.

हे वाचलंत का :

  1. Google Pay वापरकर्त्यांना मिळणार सहज कर्ज, मुथूट फायनान्सशी करार - Google Pay gold loan
  2. गुगलमध्ये इंटर्नशिपची उत्तम संधी, जाणून घ्या कुठं, कसा अर्ज करायचा? - Google internship 2025
  3. गुगलनं युजर्ससाठी लाँच केलं 'हे' अप्रतिम फीचर, जाणून घ्या काय आहे खास - Google Gemini Live Feature Launch

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.