कराची: पाकिस्तानमधील कराची विमानतळाबाहेर रविवारी भीषण स्फोट झाला. या स्फोटात दोन जणांचा मृत्यू झाला. तर किमान 8 जण जखमी झाले. या स्फोटात चिनी नागरिकांना लक्ष्य करण्यात आले. या बॉम्बस्फोटाची जबाबदारी पाकिस्तानची दहशतवादी संघटना बलूचिस्तान लिबरेशन आर्मीनं (BLA) स्वीकारली आहे.
कराचीतील जिना आंतरराष्ट्रीय विमानतळावरून निघालेल्या चिनी अभियंते आणि गुंतवणूकदारांच्या ताफ्यावर हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात आत्मघाती वाहन बॉम्बचा वापर करण्यात आला. सिंध प्रांताचे गृहमंत्री जिया उल हसन यांनी स्थानिक माध्यमांना स्फोटाची माहिती दिली. ते म्हणाले, "हा हल्ला विदेशातील नागरिकांना लक्ष्य करण्यात आले. हा स्फोट पाकिस्तानमधील सर्वात मोठ्या विमानतळाबाहेर झाला. हा स्फोट विमानतळावरून बाहेर जाणाऱ्या रस्त्यावर झाला. स्फोटानंतर लागलेल्या आगीत आसपासची वाहने जळून खाक झाली आहेत.
- पाकिस्तानमध्ये हजारो मजूर बेल्ट अँड परियोजनेवरून काम सुरू आहे. या योजनेसाठी चीनकडून मोठ्या प्रमाणात निधी देण्यात येत आहे. या मार्गामुळे दक्षिण आणि मध्य आशियाला चीनची राजधानी बीजिंग जोडली जाणार आहे.
स्फोटानंतर कडक सुरक्षा व्यवस्था- स्फोटानंतर परिसरात कडक सुरक्षाव्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. डिप्टी इन्स्पेक्टर जनरल ईस्ट अजफर महेसर यांनी माध्यमांशी सांगितलं," तेल टँकरमध्ये स्फोट झाल्याची शक्यता आहे. आम्ही स्फोटामागील कारणांचा शोध घेत आहोत. जखमींमध्ये पोलीस अधिकारीदेखील आहेत. स्फोट एवढा भयंकर होता की विमानतळावरील इमारतीलाही हादरले बसले आहेत.
दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी- रविवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास जिना आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ पोर्ट कासिम इलेक्ट्रिक पॉवर कंपनीच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. चिनी दूतावासानं एक निवेदन जारी करून हल्ल्याचा निषेध केला. हल्ल्याची सखोल चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी चिनी दूतावासाने पाकिस्तानकडे केली आहे. यासोबतच चिनी नागरिक, संस्था आणि विविध प्रकल्पांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं ठोस पावले उचलावीत, अशी चीननं पाकिस्तानकडं मागणी केली आहे.