ETV Bharat / health-and-lifestyle

मधुमेह आणि हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी दैनंदिन जीवनात आत्मसात करा 'ही' सवय - Benefits Of Walking - BENEFITS OF WALKING

Benefits Of Walking: सुदृढ आरोग्यासाठी नियमित व्यायाम करणं गरजेचं आहे. कामाच्या व्यस्ततेमुळं अनेक जण व्यायामाकडे दुर्लक्ष करतात. यामुळं अनेक समस्या उद्भवतात.

Benefits Of Walking
नियमित चालण्याचे फायदे (Getty Images)
author img

By ETV Bharat Health Team

Published : Oct 7, 2024, 11:53 AM IST

Updated : Oct 7, 2024, 2:25 PM IST

Benefits Of Walking : उत्तम आरोग्यासाठी नियमित व्यायाम करणं गरजेचं आहे. हे सर्वांना माहिती आहे. परंतु वेळेचं गणित काही केल्या जमत नाही. यामुळं व्यायामाकडे दुर्लक्ष होतं. परंतु असे काही व्यायाम आहेत, ज्याकरिता आपल्याला जिममध्ये जाऊन पैसे खर्च करण्याची गरजदेखील पडत नाही. असाच एक व्यायाम म्हणजे चालणे आहे. नियमित 30 मिनिटं आपण चाललो तर उत्तम आरोग्य जगू शकतो. चालणं ही नैसर्गिक क्रिया आहे. जी कधीही आणि कुठेही करता येते. गार्डनमध्ये, रस्त्यावर तसंच मोकळ्या मैदानात आपण कुठेही चालू शकता. चालण्यानं शरीरात जमा झालेली चरबी बर्न होते. तसंच रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि चयापचय सुधारतं. याचबरोबर नियमित चालल्यास मधुमेह टाइप 2, हृदयविकाराचा झटका आणि ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी करण्यासदेखील मदत होऊ शकते.

चालण्याचे फायदे

  • वजन नियंत्रणात राहतं: अयोग्य खानपानाच्या सवयीमुळं वजन वाढण्याची समस्या गंभीर झाली आहे. आज पाचपैकी एक जण ओव्हरवेटच्या समस्येनं त्रस्त आहे. परंतु तुम्ही नियमित चालल्यास तुमचं वजन कमी होऊ शकतं. कारण यामुळे शरीरात जमा झालेली चरबी वितळण्यास मदत होते. परिणामी वजन कमी होते. दररोज अर्धा तास मध्यम गतीनं चालल्यास 150 कॅलरीज बर्न होऊ शकतात.
  • हृदयाचं आरोग्य सुधारतं : मॉर्निंग वॉक किंवा जॉगिंग केल्यास हृदयाच्या आरोग्यास लक्षणीय फायदा होतो. जेव्हा आपण चालतो तेव्हा हृदयाची गती वाढते आणि रक्तदाब कमी होतो. तसंच दररोज चालण्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो शिवाय फुफ्फुसाची क्षमता वाढते.
  • व्हिटामिन 'डी'ची पातळी : दररोज फिरायला गेल्यामुळं व्हिटॅमिन डीची पातळी सुधारते.
  • रोगप्रतिकार शक्ती वाढते : रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी चालणं हा एक चांगला मार्ग आहे.
  • मूड सुधारतो : दररोज चालण्यानं मूड सुधारतो. तसंच तणाव आणि चिंता कमी करण्यासाठी चालणं फायदेशीर आहे. चालण्यामुळं सकारात्मक विचार करण्यास मदत होते. त्याचबरोबर स्मरणशक्ती, विचार आणि बुद्धिमत्ता सुधारण्यासाठीदेखील हे प्रभावी आहे.
  • चांगली झोप : निद्रानाश, घोरणं आणि स्लीप एपनिया यांसारख्या समस्यांवर चालणं हा एक चांगला उपाय आहे. शारीरिक हालचालींमध्ये गुंतल्यानं शरीराला नैसर्गिक विश्रांती आणि चांगली झोप मिळते.
  • ऊर्जा वाढते : थकवा आणि सुस्तीला दूर ठेवण्यासाठी चालणं हा एक उत्तम मार्ग आहे. दिवसातून 30 मिनिटं चालणं, तुम्हाला ऊर्जेसह नियमित कार्य पूर्ण करण्यात मदत करू शकतं.
  • हाडं मजबूत होतात : हाडं आणि स्नायू मजबूत करण्यासाठी दिवसातून किमान 30 मिनिटं चालणं चांगलं आहे. यामुळं हाडांचं आरोग्य सुधारतं. तसंच ऑस्टिओपोरोसिससारखी समस्या दूर होऊ शकते.

संदर्भ

https://www.health.harvard.edu/staying-healthy/5-surprising-benefits-of-walking

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

हेही वाचा

  1. स्ट्रेसमध्ये आहात? अशी मिळवा मुक्तता - Simple Way Reduce Stress
  2. वयानुसार रोज किती बदाम खावेत? जाणून घ्या तज्ञ काय सांगतात - Almonds To Eat According To Age

Last Updated : Oct 7, 2024, 2:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.