ETV Bharat / politics

कोल्हापुरामध्ये महायुतीत धुसफूस वाढली, उत्तरनंतर दक्षिणेत शिवसेनेनं थोपटले 'दंड' - Kolhapur Assembly Election

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी तयारी सुरु केलीय. मात्र, असं असतानाच कोल्हापूरमध्ये महायुतीच्या नेत्यांमध्ये धुसफूस पाहायला मिळत आहे.

Dispute In Mahayuti BJP and Shivsena Shinde Group over Kolhapur South and North Assembly Constituency
कोल्हापुरामध्ये महायुतीत धुसफूस (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 7, 2024, 11:27 AM IST

कोल्हापूर : लवकरच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता असून या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. दोनच दिवसांपूर्वी लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी कोल्हापूरचा झंझावाती दौरा केला. या दौऱ्यात विचारधारेची आखणी करताना छत्रपती शिवरायांपासून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधान हा साचा घट्ट करत पश्चिम महाराष्ट्रात इंडिया आघाडीसह महाविकास आघाडीला बळ देण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुसरीकडं महायुतीतील धुसफूस आता पुढे येत आहे. "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात वाढलेल्या ताकदीमुळं कोल्हापूर उत्तर विधानसभा जिंकूच. मात्र, दक्षिणचा आमदार ही शिवसेनाच ठरवणार," असा निर्धार राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केलाय.

कोल्हापूर उत्तर मधून लढण्यास भाजपाही इच्छुक : कोल्हापुरात बहुतांश शहरी भाग असलेला कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात गेल्या 30 वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र, 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसनं या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर विधानसभा मतदारसंघावर शिवसेना शिंदे गटानं आपला हक्क सांगत राजेश क्षीरसागर यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. परंतु, याच जागेवरुन भाजपा आणि शिवसेनेत जोरदार वाद सुरू झालाय. भाजपाकडून खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र कृष्णराज महाडिक, पोटनिवडणुकीचे उमेदवार सत्यजित कदम, भाजपाशी एकनिष्ठ असलेले राहुल चिकोडे उत्तर मधून इच्छुक आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी राजेश क्षीरसागर माध्यमांशी बोलताना खासदार महाडिक यांनी आपल्या मुलाला समजावून सांगावं, असं म्हणाले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा ते ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय.

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर (ETV Bharat Reporter)

उत्तरमध्ये डोकवाल तर आम्ही दक्षिणेत येऊ : राजेश क्षीरसागर यांनी रविवारी (6 ऑक्टोबर) कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात मेळावा घेतला. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. येथून धनंजय महाडिक यांचे बंधू अमल महाडिक निवडणूक लढण्याची तयारी करत आहेत. यामुळं क्षीरसागर यांनी दक्षिणेत मेळावा घेत एक प्रकारे आपली ताकद तर दाखवून देण्याचा प्रयत्न केला. तसंच या मेळाव्याच्या माध्यमातून "तुम्ही उत्तरमध्ये डोकवाल तर आम्ही दक्षिणेत तुमच्यामध्ये येऊ" असा इशाराही क्षीरसागर यांनी दिला.

दक्षिणचा आमदार देखील आम्हीच ठरवणार : कळंबा येथे सांस्कृतिक हॉलमध्ये पडलेल्या मेळाव्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी क्षीरसागर यांचं जंगी स्वागत केलं. यावेळी राजेश क्षीरसागर यांनी गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या रिंग रोडच्या कामाला दहा कोटी रुपये देणार असल्याचे जाहीर केलं. तसंच आपलं काम केवळ उत्तर मध्येच नाही तर दक्षिणमध्ये देखील आहे. शहरी भागात कुटुंब वाढल्यानं उत्तर मधील मतदार दक्षिणमध्ये राहायला आलेत. दक्षिणमध्ये देखील अनेकजण शिवसेनेला मानणारे आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात महायुती पुन्हा सत्तेत येणार हे कोणत्या ज्योतिषीला सांगण्याची गरज नाही. उत्तर तर आम्ही जिंकणारच. मात्र, दक्षिणचा आमदार देखील आम्हीच ठरवणार, असं क्षीरसागर म्हणालेत. त्यामुळं महायुतीमध्ये जागावाटपावरुन उत्तरमध्ये आग लागली असली तरी त्याचा धूर आता दक्षिणेमध्ये निघू लागलाय.

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात उमटणार पडसाद : बुधवारी (9 ऑक्टोबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात विविध विकास कामांचं उद्घाटन होणार असल्यानं महायुतीतील ही धुसफूस लवकरात लवकर मिटावी यासाठी दस्तूरखुद्द मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करावा लागणार आहे. माजी आमदार राजेश क्षीरसागर शिवसेनेची मूठ बांधत असल्यानं दोन्ही मतदार संघाबाबत मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडं कोल्हापूर जिल्ह्याचं लक्ष लागलंय.

हेही वाचा -

  1. पुण्यात भाजपामध्ये खडाजंगी; माझ्यावर अन्याय झाला म्हणत प्रसन्न जगताप आक्रमक - Prasanna Jagtap
  2. विशाळगड नुकसानग्रस्तांना इंडिया आघाडीनं दिलेली मदत म्हणजे पुतना मावशीचं प्रेम; धनंजय महाडिक यांचा हल्लाबोल - Help To Vishalgarh Victims
  3. 'अब की बार, 400 पार'चा नारा पूर्ण होणारच, भाजपा खासदार धनंजय महाडिक यांचा विश्वास - MP Dhananjay Mahadik Claims

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.