नाशिकमध्ये बहुतांश बाजार समित्या आज बंद, नेमकं कारण काय? - Nashik Market Committees Close
🎬 Watch Now: Feature Video
Published : Oct 7, 2024, 12:30 PM IST
मनमाड : लासलगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यांनी आज बंद पुकारला आहे. राज्यातील बाजार समित्यांच्या विविध मागण्याकडं शासनाचं लक्ष वेधण्यासाठी, तसंच महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय परिषदेत मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलेल्या अपमानस्पद वागणुकीच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आल्याचं सांगितलं जातंय. बंदमुळे कांदा, धान्य आदी लिलाव ठप्प होऊन बाजार समित्यात शुकशुकाट पसरल्याचं पाहायला मिळतंय. सध्या कांद्याला चांगला भाव मिळत असताना अचानक बंद पुकारण्यात आल्यामुळं शेतकऱ्यांची गैरसोय झाली आहे. कांद्याला चांगला मिळायला लागला की कधी व्यापारी कधी संघटना तर कधी राजकीय पक्ष कोणी या ना त्या कारणानं बंद पुकारून आम्हाला वेठीस धरतात, असा आरोप शेतकऱ्यांकडून केला जातोय.