यवतमाळ - जिल्ह्यात गेल्या 24 तासात कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांचा आकडा 195 ने जास्त आहे. जिल्ह्यात 815 जण पॉझिटिव्ह आले असून 1010 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तसेच जिल्ह्याबाहेरील 2 जणांसह जिल्ह्यात एकूण 23 कोरोना मृत्यूची नोंद झाली. यातील वैद्यकीय महाविद्यालयात 17, खासगी कोविड रुग्णालयात 4 आणि डीसीएचसीमध्ये 2 मृत्यू झाले आहेत.
मृत्यूदर 2.38 टक्के
आज (11 मे) यवतमाळ जिल्ह्यात एकूण 6589 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 815 जण नव्याने पॉझिटिव्ह आले, तर 5774 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सध्या जिल्ह्यात 7088 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यापैकी रुग्णालयात 2689 तर गृह विलगीकरणात 4399 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 63652 झाली आहे. गेल्या 24 तासात 1010 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 55047 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1517 मृत्यूची नोंद आहे. सध्या जिल्ह्याचा कोरोना रूग्ण पॉझिटिव्हीटी दर 13.14, तर मृत्यूदर 2.38 टक्के आहे.
रुग्णालयात 737 बेड उपलब्ध
यवतमाळ जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 7 डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर आणि 29 खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये एकूण 737 बेड उपलब्ध आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 426 बेड रुग्णांसाठी उपयोगात आहेत. तर 151 बेड शिल्लक आहेत. 7 डीसीएचसीमधील एकूण 386 बेडपैकी 147 रुग्णांसाठी उपयोगात, 239 बेड शिल्लक आहेत. 29 खासगी कोविड रुग्णालयात एकूण 1044 बेडपैकी 717 उपयोगात तर 347 बेड शिल्लक आहेत.
हेही वाचा - जगभरातून पंतप्रधान मोदींवर होणारी टीका अयोग्य - पटोले
हेही वाचा - ठाकरे सरकारने कोरोनाच्या काळात कोकणाला वाऱ्यावर सोडलंय - प्रसाद लाड